आजचे राशिभविष्य शुक्रवार,६ नोव्हेंबर २०२६ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
अश्विन कृष्ण द्वादशी / सकाळी १०.३१ नंतर त्रयोदशी.पराभव नाम संवत्सर,शके १९४८,शरद ऋतू.
“सकाळी ११.०० पर्यंत चांगला दिवस आहे”
नक्षत्र – हस्त. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या.
गुरू द्वादशी, धनत्रयोदशी, प्रदोष.
आज गुरू द्वादशी, धनत्रयोदशी आणि प्रदोष आहे. सकाळी ११.०० पर्यंत दिवस अनुकूल राहील. चंद्र प्रतियुती शनी योगामुळे त्यानंतर कामात विलंब किंवा अडथळे जाणवू शकतात. जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगावी. महत्त्वाची कामे शक्यतो सकाळच्या अनुकूल वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

राशिभविष्य – (Marathi Rashi Bhavishya)

मेष:-(चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ) सकाळचा काळ अनुकूल आहे. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. दुपारनंतर कामात संयम राखा.

वृषभ:- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो) सकाळी कामात अनुकूलता लाभेल. आर्थिक व्यवहारातून फायदा होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. दुपारनंतर जबाबदाऱ्या वाढू शकतात. खर्चाचे नियोजन करा.

मिथुन:- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा) बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल. नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. महत्त्वाची कामे सकाळी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. दुपारनंतर संयमाने वागा.

कर्क:-(हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो) कौटुंबिक बाबतीत अनुकूलता राहील. आर्थिक व्यवहारात नियोजन आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी काही अडथळे जाणवू शकतात. वरिष्ठांशी संवाद साधताना संयम ठेवा.

सिंह:- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे) नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका.

कन्या:- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो) आपल्या राशीत चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. सकाळी ११.०० पर्यंत कामात चांगली प्रगती होईल. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. दुपारनंतर कामात विलंब होऊ शकतो. आरोग्याकडे लक्ष द्या.

तूळ:-(रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते) दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील. कामात अधिक मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. अनावश्यक खर्च टाळा. महत्त्वाची कामे शक्यतो सकाळी पूर्ण करा.

वृश्चिक:- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु) मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. नोकरी-व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक बाबतीत नियोजन करा. दुपारनंतर महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक पावले उचला.

धनु:-(ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे) कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक आहे. कौटुंबिक बाबतीत संयम राखा. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.

मकर:- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी) भाग्याची साथ मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रवासात काळजी घ्या. दुपारनंतर कामात विलंब होऊ शकतो.

कुंभ:- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा) आर्थिक व्यवहारात विशेष काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात. सहकाऱ्यांशी मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा.

मीन:- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची) नोकरी-व्यवसायात सहकार्य मिळेल. भागीदारीच्या कामात स्पष्टता ठेवा. आर्थिक नियोजन महत्त्वाचे ठरेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना संयम राखा.

(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.“राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521) 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!