आजचे राशिभविष्य सोमवार,२३ नोव्हेंबर २०२६ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक(Marathi Rashi Bhavishya)
कार्तिक शुक्ल चतुर्दशी. पराभव नाम संवत्सर, शके १९४८, शरद ऋतू.
वैकुंठ चतुर्दशी, कार्तिक स्वामी दर्शन.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष.
नक्षत्र – भरणी. 
ग्रहयोग – रवी त्रिकोण नेपच्यून, चंद्र प्रतियुती बुध.
आज चांगला दिवस आहे. रवी त्रिकोण नेपच्यून योगामुळे कल्पनाशक्ती, आध्यात्मिकता आणि अंतर्ज्ञानाला चालना मिळेल. चंद्र प्रतियुती बुध योगामुळे संवादात काही गैरसमज किंवा विचारांमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात नवीन कल्पना सुचतील. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगावी. महत्त्वाचे निर्णय घेताना स्पष्ट विचार आणि संयम ठेवणे हिताचे ठरेल.

राशिभविष्य (Marathi Rashi Bhavishya)

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र तुमच्याच राशीत असल्याने उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, बोलताना संयम ठेवा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. मानसिक शांतता राखण्याचा प्रयत्न करा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) मित्रमंडळींकडून उत्तम सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. नवीन संपर्क फायदेशीर ठरतील.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) नोकरी-व्यवसायात जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांशी संवाद साधताना संयम ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमच्या कार्यक्षमतेचे कौतुक होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) भाग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. प्रवासाचे योग येतील. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील.

कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगावी. अचानक खर्च उद्भवू शकतात. मालमत्तेच्या संदर्भात निर्णय विचारपूर्वक घ्या. कौटुंबिक बाबतीत संयम ठेवा. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

तूळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) भागीदारीच्या व्यवसायात अनुकूलता राहील. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. नवीन करार करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. मात्र, संवादात गैरसमज टाळा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) कामाचा व्याप वाढू शकतो. सहकाऱ्यांशी संवाद साधताना संयम ठेवा. आर्थिक व्यवहारात लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. नियोजनपूर्वक काम केल्यास यश मिळेल.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) बौद्धिक आणि कलात्मक कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधात अनुकूलता राहील. नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल.

मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) घरगुती वातावरण आनंदी राहील. मालमत्तेच्या संदर्भात सकारात्मक निर्णय होऊ शकतात. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरी-व्यवसायात अनुकूलता राहील. घरातील प्रलंबित कामे मार्गी लागतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) तुमच्या पराक्रमात आणि कार्यक्षमतेत वाढ होईल. भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. नवीन लोकांशी संपर्क फायदेशीर ठरेल. आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील.

मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. नवीन वस्तूंच्या खरेदीचे योग आहेत. आर्थिक व्यवहारातून फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र, बोलताना स्पष्टता ठेवा आणि अनावश्यक खर्च टाळा.

(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.“राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521) 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!