मुंबई-मुंबईतील लालबाग परिसरात असलेल्या वन अविघ्न पार्क या ६० मजली रहिवासी इमारतीच्या १९ व्या मजल्यावर भीषण आग लागली असून आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या आहेत.आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु असून इमारत उंच असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात अडचणी येत आहेत.
आगीची घटना घडताच १९ व्या मजल्यावरुन एका व्यक्तीने उडी घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हा व्यक्ती जखमी झाला असून त्याला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
इमारतीती अनेक लोक अडकून पडले आहेत. यातील काही कामगारांना आता इमारतीतून बाहेर काढण्यात यश आलं आहे. मात्र, अजूनही काही कामगार इमारतीच्या आत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तसंच, लोकांना बाहेर काढण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहेत.
दरम्यान, ही इमारत करी रोड स्थानकाच्या जवळ असून निवासी इमारत आहे. मात्र, अद्याप या इमारतीत दुरुस्तीचे काम सुरू असताना ही आग लागली आहे. त्यामुळं या इमारतीत रहिवाशी जास्त नव्हते. तर, काही कामगार घटनास्थळी उपस्थितहोते.अशी माहिती मिळत आहे.
Mumbai | One person dead in fire at Avighna Park apartment building on Curry Road pic.twitter.com/pMdV4tNP7h
— ANI (@ANI) October 22, 2021