प.सा. नाट्यमंदिरात रंगकर्मींचा जल्लोष

0

 

नाशिकच्या रंगकर्मीचे आवडते सार्वजनिक वाचनालयाच्या  परशुराम सायिखेडकर नाट्यमंदिर कोरोनाच्या प्रदीर्घ काळानंतर खुले होणार त्यासाठी सर्व रंगकर्मी प.सा. नाट्यगृहात एकत्रित येऊन नाट्यगृह खुले होण्याचा आनंद व्यक्त केला. ज्येष्ठ अभिनेते दीपक करंजीकर व सौ. विद्या करंजीकर यांच्या शुभहस्ते रंगमंच व नटराज पूजन करून जल्लोषात स्वागत करण्यात आले.

 

यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक सुनील देशपांडे यांनी नांदी सादर केली तर ज्येष्ठ लेखक विवेक गरुड यांनी स्वरचित कवितेचे वाचन केले, सुप्रसिद्ध बासरी वादक संगीतकार  मोहन उपासनी यांनी बासरीचे सुमधुर असे सूर नाट्यमंदिरात बऱ्याच काळानंतर रंगकर्मीना ऐकायला मिळाले, तसेच कोकण येथील रत्नागिरीची सुहानी अंकुश नाईक हिने पु.ल.देशपांडे यांच्या कोकणातील प्रवासबद्दल गमंती जमंती सांगितल्या आणि कुसुमाग्रज यांची कणा कविता सादर केली. कार्यक्रमाचे स्वागत, सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन ज्येष्ठ रंगकर्मी ईश्वर जगताप यांनी केले.


यावेळी वाचनालयाचे कार्याध्यक्ष संजय करंजकर,ज्येष्ठ रंगकर्मी सुप्रसिद्ध दिग्दर्शक मुकुंद कुलकर्णी, ज्येष्ठ रंगकर्मी आणि नेपथ्यकार आनंद ढाकीफळे, सुप्रसिद्ध आर जे भूषण मठकरी, ज्येष्ठ रंगकर्मी माधुरी कुलकर्णी, ऑर्केस्ट्रा असोसिएशनचे अध्यक्ष उमेश गायकवाड ,सुप्रसिद्ध अभिनेते रवी साळवे, ज्येष्ठ अभिनेते आणि दिगदर्शक रवींद्र  ढवळे, दीप्ती भालेराव, आदिती मोराणकर,अभिनेत्री लक्ष्मी पिंपळे, अभिनेत्री  पल्लवी ओढेकर,राजा पाटेकर, स्वप्नील तोरणे, विशाल जातेगांवकर,नंदकुमार देशपांडे, सुप्रसिद्ध अभिनेता सागर कोरडे, नेहा निमगावकर, भूषण भावसार,सुप्रसिद्ध अभिनेता विक्रम गावंदे, अमेय कुलकर्णी, अभिनेत्री मोहिनी भगरे, अभिनेत्री  प्रिया सुरते,ऋषिकेश रोटे, अभिजित पाठक,अभिनेत्री सई मोराणकर, हरिकृष्ण डीडवाणी, सुप्रसिद्ध दिग्दर्शक रविंद्र जन्नावार, चैतन्य गायधनी तसेच सावाना सेवकवृंद आदी उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.