हरि अनंत,नाशिक
रवि-चंद्र-बुध-शुक्र-शनि : गर्भश्रीमंत, बुद्धी वेड्यासारखी, शारीरिक व्यंगाची शक्यता, संतती चांगली होते. भाग्योदय उशिरा अथवा वृद्धावस्थेत
रवि-चंद्र-बुध-शुक्र-शनि- या योगात बुधाचे फळ मिळत नाही.
रवि-चंद्र–गुरू-शुक्र-शनि : या योगात व्यक्तीला आपत्ती- विपत्ती, फार थांबावे लागते. जेमतेम पोट भरतो, नोकरीच करण्याची लायकी असते. त्यात पुढे येतात. वृद्धपकाळी भाग्योदय होण्याची शक्यता. कदाचित वकीली व्यवसाय लाभेल.
रवि-मंगळ-बुध-गुरू-शनि :आययुष्य- भर प्रकृती चांगली, मिलीटरीत राहणारा सेनापती, युद्धप्रवीण,गंभीर,उदात्त विचारांचा, गणितज्ञ, कायदेपंडित, राष्ट्राचे राजकारण चालवणारा.
रवि-मंगळ-बुध-शुक्र-शनि : या योगा- नंतर वडील बेपत्ता होतात किंवा जन्मापूर्वी त्याना देवाज्ञा होते. स्वकष्टाने पुढे येतो. परदेशी मालाचा एजंट होतो.-रवि-मंगळ-गुरू-शुक्र-शनि :या योगात कोणत्याही शास्त्रात इंजिनिअर होतो. खाणी वगैरेमध्ये नोकरी.मुत्सद्दी, धोरणी, राजकारणी, संतीसौख्य कमी, सौख्य कमी. एकांतात राहणे आवडते.
रवि-बुध-गुरू शुक्र-शनि :ही युती नास्तिकपणाची आहे. मुलगा अतिशय दरिद्री निपजतो. संतती चांगली होत नाही. जमत नाही.
रवि-चंद्र-मंगळ-बुध-शुक्र- शनि :धन, प्रधान, स्त्री, पुत्र यांच्यापासून दुःखी. शांतवृत्ती, मंत्री, नेता, नीचकर्म रत,क्षय, पीनस रोगाने पोडीत, थोडा धनवान, मुले, स्त्री सुशील असतात संपत्तीचे सुख प्राप्त होते. षडरिपु ताब्यात ठेवतात .
रवि-चंद्र-बुध-गुरू-शुक्र-शनि:डोकेदुखी रोग, चांगल्या कीर्तीचा, माथेफिरू,ओसाडजागी राहणारा व परदेशात गेलेला, मेंदूचे विकार, वेड, उन्माद.
रवि-चंद्र-मंगळ-बुध-गुरू-शनि : या योगात पूर्व वयात अत्यन्त कष्टी, आई- बाप लहानपणी जातात. शिक्षण चांगले, संतती भाग्यहीन असते. त्यांच्यापासून खूप त्रास भोगावा लागतो. पूर्वाजित इस्टेट नसेल तर काहीतरी उद्योग करतो. उत्तरार्धात नोकरी करतो. कोणत्या तरी योगात पुढे येतो. हा क्रांतिकारी योग आहे. पण 6/12 स्थानात 1/8/9 लग्नाला शुभ आहे. बाकीचौ लग्नाला अशुभ आहे. हा योग वैराग्य योग समजण्यास हरकत नाही.
रवि-चंद्र-मंगळ-बुध-शुक्र-शनि : या योगात पूर्वार्जीत इस्टेट असत नाही . जन्मदरिद्रीच असतो. बहुभार्या योग आहे. व्यभिचारी. जसजशा बायका होतात, तसतसा पैसा मिळतो. सट्टा, लॉटरी वगैरे मार्गांनी पैसा मिळवतो. राजमान्य होतो, इस्टेट मोठी करतो, वाहन वगैरेंचे सुख मिळते.
रवि-चंद्र- मंगळ-गुरू-शुक्र-शनि : हा योग भयंकर आहे. लहानपणापासून– कष्ट वडिलोपार्जित (क्रमशः)
भाग -१४२
संपर्क-9096587586