ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
पौष कृष्ण द्वादशी.हेमंत ऋतू, उत्तरायण.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज चांगला दिवस *शनिप्रदोष* आहे”
चंद्रनक्षत्र: मूळ
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अचानक धनलाभ होतील. गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळेल. दूरचे प्रवास संभवतात. कर्जे मंजूर होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आरोग्य सांभाळा. वाहने जपून चालवा. अग्निपासून सावध रहा.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) भ्रमंती घडेल. कामानिमित्त धावपळ होईल. विजयी व्हाल. क्रोध आवरा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम लाभाचा दिवस आहे. संधीचे सोने करा. अचानक लाभ होतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. अपत्य संबंधित शुभ समाचार समजतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) मानसिक सौख्य लाभेल. मौल्यवान खरेदी कराल. शुभ फळ मिळेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू, ते) आर्थिक प्राप्ती चांगली होईल. गुंतवणूक लाभदायक ठरेल. संपत्तीत वाढ होईल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) फारसा अनुकूल कालावधी नाही. खर्चात वाढ संभवते. विनाकारण वाद विवाद होतील. कमी बोला.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा, भे) संमिश्र ग्रहमान आहे. सावकाश वाटचाल करा. मन साशंक राहील. क्रोध आवरा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मानसिक आरोग्य सांभाळा. खर्चात वाढ होईल. मात्र काही शुभ घटना घडतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक यश मिळेल. व्यवसायात वाढ होईल. आनंदी राहाल. दबदबा वाढेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) वरिष्ठ खुश होतील. धनलाभ होईल. व्यवसायात वाढ होईल. स्वप्ने साकार होतील.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)