लहान मुलांना तात्या आजोबा फार आवडतात – सी. एल. कुलकर्णी

झी मराठीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिकेत तात्या आजोबांची भूमिका साकारणारे सी. एल. कुलकर्णी यांच्याशी खास संवाद

0

मुंबई – झी मराठीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं हि मालिका आणि त्यातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भलत्याच पसंतीस पडल्या आहेत. त्यातील एक व्यक्तिरेखा म्हणजे तात्या आजोबांची. हि भूमिका जेष्ठ अभिनेते सी.एल. कुलकर्णी अगदी चोख निभावत आहेत. असे आजोबा आपल्या कुटुंबात देखील हवे हे मालिका पाहताना प्रकर्षाने जाणवतं.

त्यांच्या या लोकप्रिय भूमिकेविषयी बोलताना ते म्हणाले, “तात्या म्हणजे एक रसिक, सुजाण, समंजस, कर्तृत्ववान, परंतु कुटुंबवत्सल, चुकीला चूक मानणारं, वेळ पडल्यास आनंदाने निसंकोचपणे शरण जाणारं निर्मळ व्यक्तिमत्व. साधी राहणी, उच्च विचारसरणी हा त्या व्यक्तिमत्वाचा गाभा. कुठल्याही बाबीचा सर्वांकष विचार करून, नीरक्षीर विवेकाने अडचणींवर मत करून कोणालाही न दुखावता सरात्मक तोडगा काढण्याचा त्यांचा स्वभाव. सामाजिक दायित्वाची जाण असणारा, एकजुटीचं महत्व जाणणारा, घरात धाक पण तरीही अतिरेकी जाच नसणारा, विचारी, विवेकी, चांगल्या गोष्टींना मनापासून दाद देणारा, खेळकर, आनंदी, प्रगतिशील आणि आदर्श माणूस. कोणालाही हवीहवीशी आणि आपलीशी वाटणारी अशी हि व्यक्तिरेखा, विशेतः लहान मुलांना हे तात्या आजोबा फार आवडतात हे लक्षात आलंय माझ्या.” नाती जोडून ठेवण्यासाठी कुलकर्णी काकांनी एक मोलाचा सल्ला दिला तो म्हणजे, “समाज सौष्ठवासाठी आधी कुटुंब बांधता आलं पाहिजे.

आपण प्रत्येकासाठी आहोत आणि प्रत्येकजण आपला आहे हि भावना हा त्यासाठी एक महत्वाचा धागा आहे. माणूस हा त्याच्या गुणदोषांसहित स्वीकारावा लागतो. हे सगळं या मालिकेतून अतिशय उत्तमरीत्या दाखवलं आहे त्यामुळे हि मालिका प्रेक्षकांना देखील आवडतेय याचा मला आनंद आहे.”

लहान मुलांना तात्या आजोबा फार आवडतात – सी. एल. कुलकर्णी

झी मराठीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं हि मालिका आणि त्यातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भलत्याच पसंतीस पडल्या आहेत. त्यातील एक व्यक्तिरेखा म्हणजे तात्या आजोबांची. असे आजोबा आपल्या कुटुंबात देखील हवे हे मालिका पाहताना प्रकर्षाने जाणवतं. हि भूमिका जेष्ठ अभिनेते सी.एल. कुलकर्णी अगदी चोख निभावत आहेत. त्यांच्यासोबत साधलेला हा खास संवाद.

१. हि मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे, एकत्र कुटुंब पद्धतीचं दर्शन घडवण्याच्या या मालिकेविषयी तुम्ही काय सांगाल?

– एकत्र कुटुंब पद्धतीचं समर्थन करणारी हि मालिका प्रेक्षकांना देखील तितकीच आवडतेय याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. समूह भावना जरी प्रबळ असली तरी घरातील प्रत्येक सदस्यांची वैयक्तिक आवड निवड, जडण घडण, इच्छा-आकांक्षा वेगळी असते. अशा मनुष्य स्वभावाच्या परिस्थितीत समतोल कसा साधायचा किंवा तो साधता येऊ शकतो त्याची संहिता अशी हि मालिका आहे. स्वतः सोबत इतरांना बरोबर घेऊन जाताना होणारी नात्यांची भावनिक गुंतवणूक आयुष्याच्या वाटचालीत किती महत्वाची आहे हे या मालिकेत पाहायला मिळतं. वय, पिढी, संस्कार, नातं यांचं समन्वय दाखवणारी हि मालिका आहे. एखाद्याच्या वागण्याचा थेट निष्कर्ष काढण्याआधी त्याच्या मागचं कारण शोधून काढायला हवं, त्याला समजून घ्यायला हवं हा महत्वाचा कौटुंबिक कलह मिटवण्यासाठी उपयुक्त संदेश या मालिकेतील अनेक प्रसंगातून देण्यात आलेला आहे.

२. तुमची व्यक्तिरेखा देखील सगळ्यांना आवडतेय, त्याबद्दल काय सांगाल?

– तात्या म्हणजे एक रसिक, सुजाण, समंजस, कर्तृत्ववान, परंतु कुटुंबवत्सल, चुकीला चूक मानणारं, वेळ पडल्यास आनंदाने निसंकोचपणे शरण जाणारं निर्मळ व्यक्तिमत्व. साधी राहणी, उच्च विचारसरणी हा त्या व्यक्तिमत्वाचा गाभा. कुठल्याही बाबीचा सर्वांकष विचार करून, नीरक्षीर विवेकाने अडचणींवर मत करून कोणालाही न दुखावता सरात्मक तोडगा काढण्याचा त्यांचा स्वभाव. सामाजिक दायित्वाची जाण असणारा, एकजुटीचं महत्व जाणणारा, घरात धाक पण तरीही अतिरेकी जाच नसणारा, विचारी, विवेकी, चांगल्या गोष्टींना मनापासून दाद देणारा, खेळकर, आनंदी, प्रगतिशील आणि आदर्श माणूस. कोणालाही हवीहवीशी आणि आपलीशी वाटणारी अशी हि व्यक्तिरेखा, विशेतः लहान मुलांना हा तात्या आजोबा फार आवडतात हे लक्षात आलंय माझ्या.

 ३. धकाधकीच्या जीवनात आपण नाती विसरतोय अशा वेळी तुम्ही सगळ्यांना काय सल्ला द्याल?

– समाज सौष्ठवासाठी आधी कुटुंब बांधता आलं पाहिजे. आपण प्रत्येकासाठी आहोत आणि प्रत्येकजण आपला आहे हि भावना हा त्यासाठी एक महत्वाचा धागा आहे. माणूस हा त्याच्या गुणदोषांसहित स्वीकारावा लागतो हे या मालिकेत अगदी उत्तमरित्या दाखवण्यात आलं आहे.

४. या मालिकेसाठी तुमची निवड कशी झाली?

– मी एक हौशी सतेज आर्टिस्ट आहे. नाशिकमधल्या बहुतांश संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते माझे मित्र. केवळ अभिनय नाही तर जेव्हा ज्याला सहकार्य लागेल तसा तिथे माझा सहभाग असे. माझा मित्र नाट्य दिग्दर्शक सचिन शिंदे याने माझे काही फोटोज या भूमिकेसाठी वाहिनीला पाठवले. त्यावर वाहिनीचा होकार आला. माझ्यासाठी असं व्यावसायिक मालिकेत पूर्णवेळ काम करणं अगदी नवीन होतं. मी माझ्या आवडीच्या व्यवसायात मस्त व्यस्त असताना तो सांभाळून हि नवी जबाबदारी कशी पेलवायची हा प्रश्न होता मला. परंतु मला माझ्या कुटुंबाने पूर्ण पाठिंबा दिला आणि अशा प्रकारे माझी निवड झाली.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.