ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
माघ शुक्ल द्वादशी. शिशिर ऋतू.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज चांगला दिवस *भीष्म द्वादशी* आहे”
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- महत्वाची कामे सकाळी पूर्ण करा. आर्थिक आवक चांगली होईल. आरोग्य संभाळा.
वृषभ:- नवनवीन कल्पना सुचतील. संधीचे सोने करा. घाईने निर्णय घेऊ नका.
मिथुन:- वादविवाद होऊ शकतात. सहकारी मदत करणार नाहीत. चोरीचे भय आहे.
कर्क:- आज नुकसान होण्याची शक्यता आहे. औषधे घेताना अधिक काळजी घ्या. व्यसने नकोत.
सिंह:- अनुकूल दिवस आहे. कार्य सिद्धीस जाईल. उत्साह वाढेल.
कन्या:- कामाच्या ठिकाणी कुरबुरी होतील. अंदाज चुकू शकतात. काळजी घ्या.
तुळ:- अति धाडस नको संयम आणि सबुरी आवश्यक आहे. गुंतवणूक करताना काळजी घ्या. उच्च शिक्षणात अडथळे संभवतात.
वृश्चिक:- यंत्र हाताळताना काळजी घ्या. वाहने जपून चालवा. व्यसने टाळा.
धनु:- तीव्र स्पर्धा जाणवेल. छुपे विरोधक डोके वर काढतील. नोकरांपासून धिका संभवतो.
मकर:- उत्तम आर्थिक लाभ होतील. आगेकूच सुरूच राहील. मान सन्मान मिळतील.
कुंभ:- छोटे प्रवास घडतील. संतती संबंधित समाचार समजतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
मीन:- कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदारीचे काम करावे लागेल. धावपळ वाढेल. दगदग होईल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)