आजचे राशिभविष्य बुधवार, २३ मार्च २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
फाल्गुन कृष्ण षष्ठी. शिशिर ऋतू.
राहू काळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
आज संध्याकाळी ७.०० पर्यंत चांगला दिवस आहे. *संत एकनाथ महाराज षष्ठी.* अमृत संध्याकाळी ६.५२ पर्यंत. वज्र योग सकाळी १०.१९ पर्यंत. नंतर सिद्धी योग.
चंद्र नक्षत्र – अनुराधा (संध्याकाळी ६.५२ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- दगदग होईल. आरोग्य सांभाळा.  कुलदेवतेची उपासना लाभदायक ठरेल. काही चांगले प्रसंग घडतील. उत्तरार्ध अडचणी दूर करणारा आहे.
वृषभ:- जोडीदार खुश राहील. कौटुंबिक सुख लाभेल. भागीदारी व्यवसायात लाभ होतील. आर्थिक स्थिती सुधारेल.
मिथुन:- आर्थिक लाभ होतील. दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. प्रवास घडतील. व्यसने टाळा. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क:- अनुकूल दिवस आहे. नवीन कल्पना सुचतील.  स्पर्धेत मेहनतीने यश मिळेल. नवनवे प्रयोग कराल. त्यातून उत्साह वाढेल.
सिंह:-  वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. आळस झटकून कामाला लागा. धातूसंबंधीत व्यवसायात प्रगती होईल. सरकारी कामे मार्गी लागतील.
कन्या:- उत्तम आर्थिक लाभ मिळतील. मना सारखी कामे होतील. दिवस आनंदात व्यतीत कराल. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. संततीशी मतभेद नकोत.
तुळ:- कौटुंबिक सुख लाभेल. मन आनंदी राहील. शुभ समाचार समजतील. कठोर भूमिका घ्याल. येणी वसूल होतील. योग्य सल्ला घ्या.
वृश्चिक:-  आत्मविश्वास वाढेल. अडचणी दूर होऊ लागतील. भावंड मदत करतील. पराक्रम गाजवाल. दिवसाचा उत्तरार्ध दिलासादायक आहे.
धनु:- फारसा अनुकूल कालावधी नाही. मात्र तुमच्या कामातील सातत्य आणि चिकाटीमुळे तुम्ही यशस्वी मार्गक्रमण कराल. मौल्यवान खरेदी करताना काळजी घ्या.
मकर:- उत्तम दिवस आहे. शत्रू पराभूत होतील. आर्थिक येणे वसूल होईल. मतभेद मिटतील. कोर्टात यश मिळेल. विरोधक पराभूत होतील.
कुंभ:- कामाच्या ठिकाणी चांगला अनुभव येईल. आनंदी वातावरण राहील. मात्र दगदग वाढेल. संयम बाळगा. विश्रांती घ्या.
मीन:- अचानक धनलाभ होऊ शकतो. गुंतवणूक करा. शुभसूचक घटना घडतील. प्रवास घडतील. तुमच्या प्रकल्पास मान्यता मिळेल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.