१ मे पासून विमानसेवेद्वारे नाशिकला जोडली जाणार ही चार शहरे

0

नाशिक – येत्या १ मे पासून देशातील महत्वाची शहरे विमानसेवेद्वारे नाशिकला जोडली जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.आघाडीची विमानसेवा कंपनी स्पाईसजेटने तशी तयारी दर्शवली असून येत्या १ मे पासून नाशिकहून गोवा, नवी दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरू या चार प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याचे स्पाईसजेट कंपनीने जाहीर केले आहे.त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची असलेली नाशिककरांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात येणार आहे.

या विमानसेवेचे बुकींग आता कुठल्याही क्षणी सुरू होण्याची चिन्हे आहेत. स्पाईसजेट कंपनीला उन्हाळी वेळापत्रकात (समर शेड्यूल) या चारही शहरांसाठी विमानसेवेचा स्लॉट उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे एकाचवेळी देशातील तब्बल चार मोठी शहरे नाशिकशी जोडली जाणार आहेत. या सेवेसंदर्भात स्पाईसजेट कंपनीने ओझर विमानतळाची मालकी असलेल्या एचएएल प्रशासनाला तसे कळविले आहे असे असं समजते आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.