राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक

0

नवी दिल्ली – कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याचं सांगण्यात येत आहे.राजू श्रीवास्तव यांना १० ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआउट करताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर लगेचच त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं.

सुरुवातीला त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती, मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारत होती, मात्र ताज्या अहवालानुसार पुन्हा एकदा त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. ही बातमी समोर आल्याने त्याचे चाहते नाराज होत असून त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत.आता ताज्या अपडेट नुसार त्यांची प्रकृती पुन्हा चिंताजनक आहे. डॉक्टरांची एक टीम राजू यांच्यावर उपचार करत आहे. हृदयविकाराचा झटका आल्यापासून राजू हे अद्याप शुद्धीवर आले नाहीत. काही दिवसांपूर्वी त्यांना हलका ताप सुद्धा होता. त्यांच्या प्रकृतीत थोडीफार सुधारणा होती. मात्र आता पुन्हा एकदा त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याची माहिती समोर येत आहे.

आत्तापर्यंतच्या वृत्तानुसार, राजूचे मुख्य सल्लागार अजित सक्सेना यांनी सांगितले की, आज सकाळी डॉक्टरांनी राजू श्रीवास्तव मेंदू काम करत नसल्याची माहिती दिली आहे.त्यामुळे त्याचे चाहते प्रचंड नाराज झाले असून त्यांच्या प्रकृती मध्ये सुधार व्हावी म्हणून अनेक चाहते पूजापाठ करत आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!