नाशिक शहरातील ‘या’ परिसरात मंगळवार २७ सप्टेंबरला पाणीपुरवठा बंद 

0

नाशिक,२६ सप्टेंबर २०२२ –महानगरपालिका सातपूर विभागातील शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रापासुन सुरु होणारी सातपुर अशोक नगर व नाशिक पश्चिम भागातील जलकुंभ भरणारी १२०० मी.मी. व्यासाची पी.एस.सी सिमेंटची गुरुत्व वाहीनीला महिंद्रा कंपनी MQS Gate कंपाऊंड  लगत  प्रभावती हॉस्पिटल समोर १२०० मी मी व्यासाच्या पी एस सी सिमेंट पाईपलाईनला पाणी गळती सुरु झाली आहे. त्यामुळे या पाईप लाईनच्या  दुरुस्तीचे काम तातडीने करणे आवश्यक असल्याने उद्या मंगळवार दि. २७ सप्टेंबर २०२२  रोजी सदरील पाईपलाईन गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असुन, खालीलप्रमाणे नमुद संपुर्ण सातपुर जूना प्रभाग क्रमांक ८, १० व प्रभाग क्रमांक ११ भागश: मधील प्रबुद्ध नगर परिसर, तसेच  नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक ७ (भागश:) मंगळवार दि.  २७ सप्टेंबर२०२२  रोजी संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही व बुधवार दि. २८ सप्टेंबर २०२२  चा सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल असे नाशिक महानगर पालिके द्वारे कळवण्यात आले आहे.

१)सातपूर विभागातील  जुना प्रभाग  प्र.क्र. ८, व १० चा संपूर्ण परिसर व प्रभाग क्रमांक ११ मधील प्रबुद्ध नगर परिसर

२)  नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक.७(भागश:)  मधील गंगापूर रोडवरील माणिक नगर ,श्रमिक कॉलनी , गीतांजली सोसायटी, पंपिंग स्टेशन परिसर, विनय कॉलनी ,सहदेव नगर सुयोजित गार्डन ,दादाजी कोंडदेव नगर,  शांतिनिकेतन सोसायटी, चैतन्य नगर ,आयाचित नगर निर्मला कॉन्व्हेंट शाळा इत्यादी सर्व परिसर वरील प्रमाणे नमूद परिसरात  मंगळवारदिनांक २७ सप्टेंबर २०२२  रोजी संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहील.याची नागरिकांनी नोंद घ्यावी व महानगरपालिकेस सहकार्य करावे.अशी विनंती नाशिक महानगर पालिके तर्फे करण्यात आली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!