नाशिक,१८ ऑक्टोबर २०२२ – येथील इंदिरानगर वासियांची दिवाळीची सुरवात यंदा सुप्रसिद्ध गायक डॉ आशिष रानडे यांच्या स्वराशिष या शास्त्रीय गायन ,अभंग मैफिलीने होणार आहे .येथील कलासाधक मंच म्हणजे कलाश्री संगीत गुरुकुल या संस्थेत शास्त्रीय संगीताचे धडे घेणाऱ्या विद्यार्थ्यांची हि संकल्पना असून इंदिरानगर वासियांना दर दिवाळी मध्ये स्वर मैफल आयोजित करण्याचा कला साधक यांचा मानस आहे असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
कलासाधक च्या या संकल्पनेत कलाश्री गुरुकुलात शिक्षण घेणाऱ्या एका युवा कलाकाराचे हि गायन आपल्याला ऐकायला मिळणार आहे .या वर्षी कलाश्री गुरुकुलातील कु .अथर्व ठाकूर आपले गायन सादर करणार असून स्वर साधक यांच्या या संकल्पनेसाठी त्यांना मोदकेश्वर मंदिर संस्थानचे सहकार्य लाभले आहे . हा कार्यक्रम इंदिरानगर मधील प्रसिद्ध मोदकेश्वर मंदिरात होणार आहे .त्यांनतर डॉ आशिष रानडे शास्त्रीय ख्याल गायन तसेच अभंग , नाट्यसंगीत सादर करतील .
त्यांना तबल्यावर प्रसिद्ध तबला वादक श्री रसिक कुलकर्णी,हार्मोनियम वर प्रसिद्ध संवादिनी दिव्या रानडे साथ करतील .डॉ आशिष रानडे हे आनंद भाटे आणि डॉ आविराज तायडे यांचे शिष्य असून ते आकाशवाणी चे मान्यताप्राप्त ऐ ग्रेड आर्टिस्ट आहेत .गेल्या अनेक वर्षांपासून कलाश्री संगीत गुरुकुल या संस्थेद्वारे ते शास्त्रीय संगीताचे धडे देत आहेत .
स्वराशिष ही मैफल शनिवार, दि.२२ ऑक्टोबरला संध्याकाळी ६ वाजता होईल तरी या मैफलीचा आस्वाद जास्तीत जास्त रसिकांनी घ्यावा असे आवाहन कला साधक मंच यांनी केले आहे.