नेत्राचं हे बदलेलं रूप रुपालीची झोप उडवणार !

0

मुंबई,२३ नोव्हेंबर २०२२- आपल्याला नेहमीच भविष्यकाळात काय घडणार या विषयी कुतूहल असतं आणि भविष्य आपल्याला दिसू लागलं तर त्याचं आश्चर्यच वाटेल. अगदी असंच सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील नेत्राच्या आयुष्यात घडलंय. नेत्रा भविष्यात जे घडणार आहे, त्याबद्दल बोलते.

नेत्राला राजाध्यक्ष कुटुंबातून बाहेर काढण्यात रुपाली यशस्वी होते, त्यामुळे नेत्रा तिच्या घरी परत जाते. अद्वैतवर  हल्ला होतो, हे नेत्रा शेखरला सांगते त्यामुळे अद्वैतचा जीव वाचतो. शेखर नेत्राला राजाध्यक्ष कुटुंबात परत आणतो आणि नेत्राची खरी ओळख सगळ्यांना सांगतो.

अशा प्रकारे, सगळ्यांना समजतं की नेत्रा ही अव्दैतचं रक्षण करण्यासाठी या घरात आलेली आहे. अद्वैत यावर विश्वास ठेवत नाही. दुसरीकडे, नेत्रा आणि रुपाली एकमेकांसमोर येतात आणि एकमेकांना आव्हान देतात. नेत्रा रुपालीला अद्वैतच्या आईच्या रूपात दिसल्याचा भास होतो. आता नेत्राचं हे बदलेलं रूप रुपालीची झोप उडवणार का? हे पाहणे रोमांचक असणार आहे.’सातव्या मुलीची सातवी मुलगी’ सोमवार ते शनिवार रात्री  १०:३० वा. झी मराठीवर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!