ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी, हेमंत ऋतू.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज दुपारी ४.०० नंतर चांगला दिवस, *संकष्टी चतुर्थी* आहे” चंद्रोदय मुंबई – रात्री ८.४० वाजता, नाशिक – रात्री ८.३३, पुणे – रात्री ८.३६.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- महत्वाची कामे सकाळी पूर्ण करा. धार्मिक कार्यात यश मिळेल. प्राध्यापक लोकांना चांगला दिवस आहे.
वृषभ:- कलाकारांना यश मिळेल. शिक्षक लोकांना चांगली संधी. कौटुंबिक सौख्य लाभेल.
मिथुन:-संमिश्र दिवस आहे. दुपारी चांगली कामे होतील. धनलाभ होईल.
कर्क:- पूर्वार्ध काहीसा संथ आहे. खर्च वाढतील. संध्याकाळी मेजवानी मिळेल.
सिंह:- सकाळी अनुकूल आहे. कार्य सिद्धीस जाईल. महत्वाची कामे पूर्वार्धात पूर्ण करा.
कन्या:- चांगला दिवस आहे. कामे मार्गी लागतील. उत्तरार्ध अधिक चांगला आहे.
तुळ:- सकाळी छोटे प्रवास घडतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. उपासना लाभदायक ठरेल.
वृश्चिक:- पूर्वार्ध अनुकूल नाही. कामाचे नियोजन चुकेल. दुपारनंतर कामाला वेग येईल.
धनु:- सकाळच्या वेळात कामाचा वेग चांगला असेल. खुशखबर मिळेल. संध्याकाळ विश्रांतीची.
मकर:- दिवसाचा पूर्वार्ध चांगला आहे. व्यावसायिक वाढ होईल. प्रगती होईल. संध्याकाळ जोडीदारासोबत व्यतीत कराल.
कुंभ:- उत्तम ग्रहमान आहे. चांगले अनुभव येतील. कामाचे नियोजन वेगाने होईल. नवीन कल्पना सुचतील.
मीन:- घरात काही बदल घडतील. कौटुंबिक गोष्टीत रमून जाल. अपत्यांसोबत वेळ घालवा.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
