ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
फाल्गुन शुक्ल एकादशी. शिशिर ऋतू. उत्तरायण. शुभकृत नाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज सकाळी ९.०० नंतर चांगला दिवस , *आमलकी एकादशी* आहे. ”
घबाड सकाळी ९.१२ ते दुपारी ३.४३.
चंद्र नक्षत्र – पुनर्वसू (दुपारी ३.४३ पर्यंत)
आज जन्मलेल्या बाळाची राशी- मिथुन/कर्क
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-अचानक धनलाभ होतील. व्यवसायात वाढ होईल. पाण्यापासून भय आहे.
वृषभ:-पाणथळ जागेजवळ भाग्योदय होईल. कलाकारांना यश मिळेल. शब्दास मान मिळेल.
मिथुन:-मेजवानी मिळेल. आत्मविश्वास वाढेल. छोटी सहल घडेल.
कर्क:- मिश्र ग्रहमान आहे. एखादी सुखद बातमी समजेल. मात्र आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.
सिंह:- अनुकूल ग्रहमान आहे. यश मिळेल. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. मन प्रसन्न राहील.
कन्या:- कामानिमित्त भ्रमंती घडेल. जबाबदारी वाढेल. हातून भरीव कार्य घडेल.
तुळ:- एखादी चांगली बातमी समजेल. जुनी गुंतवणूक कामास येईल. फायद्याचे करार होतील.
वृश्चिक:- महत्वाचे करार आज नकोत. जोडीदाराचे मन सांभाळा. पाण्यापासून धोका संभवतो.
धनु:– प्रेमात घाई गडबड नको. महत्वाची कामे पुढे ढकलले जातील. इलेक्ट्रॉनिक वस्तू सांभाळा.
मकर:- अनुकूल कालावधी आहे. आर्थिक लाभ होतील. कामे मार्गी लागतील. व्यसने नकोत.
कुंभ:- प्रेमात यश मिळेल. धाडस कराल. संतती शी संवाद साधा.
मीन:- मातेकडून लाभ होतील. घरात मोठे बदल कराल. शेजाऱ्यांशी संवाद साधा.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
