काय आहेत फरसबीचे आरोग्यास फायदे 

डॉ.राहुल रमेश चौधरी 

0

डॉ.राहुल रमेश चौधरी 
गरम गरम पुलाव मध्ये हिरव्यागार अश्या फरसबी च्या शेंगाचे तुकडे पाहिले कि पुलाव अगदी हवाहवासा वाटतो.किंबहुना फरसबी शिवाय पुलाव नाहीच.याची भाजी देखील सुंदर लागते.यालाच श्रावण घेवडा असेही म्हणतात.चायनीज पदार्थांमध्ये ह्याचा वापर मनसोक्त केला जातो.कोवळ्या शेंगा भाजीकरीता वापरल्या जातात.ही भाजी संपूर्ण भारत भर आढळतात.अश्या या फरसबी ची आज आपण माहीती घेवूयात.

काय आहेत फरसबीचे आरोग्यास फायदे 
१.ही भाजी अतिशय रुक्ष,कोरडी,वात दोष वाढवणारी,पण थोडी भूक वाढवणारी आहे.
२.सतत बध्दकोष्ठतेची तक्रार असल्यास या शेंगा तूपावर परतून खाव्यात,व जेवण घ्यावे.
३.मधुमेही रुग्णांमध्ये लघवीत साखरेचे प्रमाण जास्त असल्यास कोवळ्या शेंगाची भाजी उकडून हळदीची फोडणी दिलेली भाजी खावी.
४.गजकर्ण सारख्या त्वचारोगावर या शेंगाच्या पाल्याचा रस व लशून रस एकत्र करून लावावा,याने लाभ होतो.
५.भगंदरा सारख्या नाडीव्रणात किंवा इतर नाडीव्रणात फरसबी च्या पाल्याचा रस करून त्यात कापूस भिजवून त्याची वात नाडीव्रणात ठेवावी.कापसाची वात रोज बदलावी.
६.रातांधळेपणात औषधांसह कोवळ्या फरसबीच्या शेंगाची भाजी खावी.लवकर लाभ होतो.

निषेध
१.जाड बी असलेल्या शेंगा खावू नये याने पोटात दुखते,जुलाब किंवा शौच्याचे खडे बनणे हे त्रास होतात.
२.या शेंगा तेलात तळून खावू नये याने उलट्या होतात,व पित्त दोष वाढतात

संपर्क- औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय
मोबाईल -९०९६११५९३०

Dr.-Rahul-Ramesh-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.