आजचे राशिभविष्य मंगळवार, २ मे २०२३

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
वैशाख शुक्ल द्वादशी.  वसंत ऋतू, शोभन नाम संवत्सर. 
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
चंद्र नक्षत्र – उत्तरा फाल्गुना. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या. 
“आज उत्तम दिवस” 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सध्या ग्रहमान अनुकूल नाही. विवक्षित निर्णय घेण्याची बुद्धी होईल. आर्थिक आवक मात्र चांगली राहील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रेमात घाई नको. संमिश्र ग्रहमान आहे. संयम बाळगा. संततीची काळजी वाटेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम ग्रहमान आहे. विजयश्री मिळेल. गृहसौख्य लाभेल. संध्याकाळ आनंदाची.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र ग्रहमान आहे. सिद्धी प्राप्त होतील. सौख्य लाभेल. संकटाचा यशस्वीपणे सामना कराल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल. व्यवसायिक उलाढाल वाढेल. अनुकूल कालावधी आहे.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल बुध, शनी तुम्हाला चांगली संधी प्राप्त करून देतील. बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल. आरोग्य सांभाळा.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) मार्ग सापडतील. राजमान्यता मिळेल. कामे मार्गी लागतील. वस्त्र खरेदी होईल. वादविवाद टाळा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल ग्रहमान आहे. विजय मिळेल. सौख्य लाभेल. धनलाभ होईल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल बुध, गुरू, शनी अन्नदादयी वातावरण निर्माण करेल. प्रतिष्ठा वाढेल. मन प्रसन्न राहील. मात्र खर्च वाढेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मानसिक शांतता लाभेल. पशु प्रेम वाढीस लागेल. हितशत्रू कडे दुर्लक्ष नको.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल रवी, राहू लाभ मिळवून देतील. नाराज बुध, गुरू शत्रू निर्माण करतील. प्रेमात यश मिळेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल बुध गुरू आर्थिक पाठबळ देतील. मात्र खर्चात देखील वाढ होणार आहे. वाहनसुख लाभेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!