आजचे राशिभविष्य मंगळवार, ९ मे २०२३

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
वैशाख कृष्ण चतुर्थी. वसंत ऋतू. शोभन नाम संवत्सर. 
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज चांगला दिवस,  घबाड दुपारी ४.०९ पर्यंत. चंद्रनक्षत्र: मूळ. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) प्रणयरम्य दिवस आहे. आनंदी रहाल. प्रवास घडतील. बहिणीशी मतभेद होऊ शकतात. दीर्घकालीन फायद्याचे करार होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आवडत्या व्यक्तीसाठी खर्च कराल. मात्र कुटुंबात मतभिन्नता होईल. अनपेक्षित लाभ होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अत्यंत आनंदाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. उत्साह वाढेल. भिन्न लिंगी व्यक्तीशी मतभेद होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. वाहन सुख लाभेल. सरकारी सन्मान मिळतील. स्त्रीधन वाढेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनपेक्षित लाभ होतील. वडिलांकडून योग्य मदत मिळेल. प्रवास कार्यसाधक होतील. प्रेमात यश मिळेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अचानक धनप्राप्ती होऊ शकते. मात्र त्यासाठी मेहनत वाढवावी लागेल. शत्रूंचा पराभव होईल. कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव येईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अकल्पित लाभ होतील. प्रतिस्पर्धीच आज मदत करेल. सुखद संवाद होईल. लक्ष्मी प्रसन्न होईल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कनिष्ठ व्यक्तीकडून लाभ होतील. स्वतःच्या आनंदासाठी खर्च कराल. जुन्या अडचणी दूर होतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) शेअर्स, लॉटरी यातून लाभ होऊ शकतो. येणी वसूल होतील. छोटे प्रवास घडतील. पत्नी खुश राहील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कामाच्या ठिकाणी प्रभाव वाढेल. घरात मोठे बदल कराल. वाहनांसाठी मनपसंत खरेदी कराल. कनिष्ठ लोकांचा तुमच्यावर प्रभाव पडेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उत्तम बौद्धिक लेखन होईल. मान सन्मान वाढेल. धाकटा भाऊ मदत करेल. आर्थिक लाभ होतील. प्रेमात यश मिळेल. सखोल विचार कराल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) कौटुंबिक सुखात वाढ होईल. मात्र काही चमत्कारिक अनुभव येतील. आर्थिक लाभ होतील. वाहन सुख लाभेल. धार्मिक कार्यात खर्च कराल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!