ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
वैशाख कृष्ण अष्टमी/नवमी. वसंत ऋतू. शोभन नाम संवत्सर.
राहूकाळ- सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
चंद्रनक्षत्र :’धनिष्ठा’ (सकाळी ११.३५ पर्यंत) क्षय दिन.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- अत्यंत शुभ दिवस आहे. कामे मार्गी लागतील. कलाकारांना उत्तम कालावधी आहे. प्रवास घडतील. छंद जोपासाल.
वृषभ:- अनुकूल दिवस आहे. कामाच्या ठिकाणी एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन कराल. गायकांना लाभदायक दिवस आहे. कष्ट वाढवावे लागतील.
मिथुन:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. सुखद अनुभव येतील. कामे मार्गी लागतील. स्वप्ने साकार होतील. आर्थिक लाभ होतील.
कर्क:- व्यवसायात वाढ होणार आहे. पैशांची तजवीज होईल. वरिष्ठांना खुश करण्यासाठी खर्च कराल. दीर्घकालीन लाभ होतील.
सिंह:- सौख्य प्रदान करणारा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. जोडीदार खुश होईल. सुखद अनुभव येतील. प्रवास घडतील.
कन्या:– कामाच्या ठिकाणी यश देणारा दिवस आहे. आर्थिक भरभराट होईल. अडचणी दूर होतील. स्त्री धन वाढेल.
तुळ:- हरवलेली वस्तू आज सापडेल. पत्नीचा सल्ला मोलाचा ठरेल. शत्रू पराभूत होतील. मौल्यवान खरेदी होईल.
वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूची खरेदी होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
धनु:- आर्थिक लाभाचा कालावधी आहे. कामात सातत्य राहील. संतती कडून खुश खबर मिळेल. छोटे प्रवास घडतील. प्रेमात यश मिळेल.
मकर:- वास्तू संबंधित महत्वाची कामे मार्गी लागतील. वक्तृत्व चमकेल. पशूलाभ होईल. चैनीवर खर्च कराल.
कुंभ:- जनसम्पर्क वाढेल. प्रवास कार्यसाधक होतील. लेखकांना यश मिळेल. प्रेमात खुशखबर मिळेल. शेअर्स मधून लाभ होऊ शकतो.
मीन:- संमिश्र कालावधी आहे. धार्मिक कामासाठी खर्च कराल. घरासाठी नवीन खरेदी होईल. मधूनच उदास वाटेल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
