‘निमा पॉवर’प्रदर्शनामुळे औद्योगिक विकासासह गुंतवणुकीला मिळणार मोठी चालना
प्रदर्शनाची तयारी पूर्णत्वाकडे :सर्व २२५ स्टॉल्सचे बुकिंग पूर्ण :लाख लोक भेट देण्याचा अंदाज
नाशिक ,दि. १७ मे २०२३ –नाशिक इंडस्ट्रीज अँड मनुफॅक्चरर्स अससोसिएशन (निमा)तर्फे १९ ते २२ मे दरम्यान त्रंबक रोडवरील आयटीआय मैदानावर आयोजित निमा पॉवर २०२३ प्रदर्शनाची तयारी पूर्णत्वाकडे आहे.सर्व २२५ स्टॉल्स बूक झाले आहेत. उद्घाटन १९ मेरोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच उद्योगमंत्री उदय सामंत व पालकमंत्री दादाजी भुसे तसेच औद्योगिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होईल,अशी माहिती निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे आणि प्रदर्शनाचे चेअरमन मिलिंद राजपूत यांनी माध्यमांशी संवाद साधतांना दिली.
नाशिक डेस्टिनेशन व नाशिकला इलेक्ट्रिकल-इलेक्ट्रॉनिकचे क्लस्टर व्हावे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन आयोजित या प्रदर्शनामुळे नाशिक उद्यमनगरीचे नांव केवळ राज्यात आणि देशातच नव्हे तर साता समुद्रापार नेण्याचा आमचा मानस आहे.सर्व वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि उद्योगसह विविध क्षेत्रांतील दिग्गज प्रदर्शनात दररोज उपस्थित राहून उद्योजकांशी संवाद साधतील तसेच यावेळी अनेक परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या होतील,प्रदर्शनामुळे औद्योगिक विकासाबरोबरच गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल तसेच नाशिकचे ब्रॅंडिंग होईल,असेही बेळे पुढे म्हणाले.
कोविडच्या काळात सर्वाधिक फटका उद्योग क्षेत्राला बसला. आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या उद्योजक पार कोलमडला आहे. त्यातून तो सावरावा यासाठी सर्व स्तरावरून विविध उपाययोजना केल्या जात असून या पॉवर प्रदर्शनामुळे उद्योजकांना नवसंजीवनी मिळणार मिळणार आहे.नाविन्यपूर्ण तसेच नवीन तंत्रज्ञानाचे स्टॉल्स हे या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य असेल. नवनवीन आव्हानांना सामोरे जाणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देणे हासुद्धा प्रदर्शनाचा मुख्य हेतू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.एचएएलचे मिग विमान हेसुद्धा या प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरणार आहे.नाशकात उद्योगधंद्यांसाठी पोषक वातावरण असून येथे इलेक्ट्रिकल-इलेक्ट्रॉनिकसह विविध नवीन उद्योग यावेत म्हणून त्यांच्यासाठी रेडकार्पेट टाकले जावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रदर्शनाला एक लाखांहून अधिक लोक भेट देतील,असा अंदाज असल्याचेही बेळे यांनी स्पष्ट केले
प्रदर्शन यशस्वीतेसाठी निमाचे सरचिटणीस राजेंद्र अहिरे,उपाध्यक्ष किशोर राठी,आशिष नहार,खजिनदार विरल ठक्कर,हर्षद ब्राम्हणकर, नितीन वागस्कर,शशांक मणेरीकर, प्रवीण वाबळे, किरण वाजे,दिलीप वाघ, कैलास पाटील गोविंद झा,संदीप भदाणे, जयंत जोगळेकर, रवींद्र झोपे, राजेंद्र वडनेरे, विराज गडकरी,संजय राठी,हेमंत खोंड,वैभव जोशी, संजय सोनवणे,श्रीधर व्यवहारे,जितेंद्र आहेर,मनिष रावळ,श्रीकांत पाटील,रवी शामदासानी,एस.के.नायर,सुधीर बडगुजर,सुरेंद्र मिश्रा,सतीश कोठारी , रावसाहेब रकिबे,प्रशांत जोशी, जयदीप राजपूत, मंगेश काठे,वेंकटेश मूर्ती,परमानंद नेहे,विश्र्वास शिंपी, बाळासाहेब जाधव, किरण लोणे, विश्वजित निकम,वैभव चावक,विश्वास शिंपी,विजय कडवाने,योगिता आहेर आदी प्रयत्नशील आहेत