नाशिक (प्रतिनिधी)- नाशिकला हाेणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सर्वस्तरावर तयारीने माेठा वेग घेतला आहे.नाशिकला या आधी हे संमेलन २००५ मध्ये झाले होते. नाशिक मध्ये ३ त ५ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या साहित्य संमेलनाचे मुख्य कार्यालय कालिदास कलामंदिर येथे असले तरी विश्वास लॉन्स येथील विश्वास हब सेंटर येथील उपकार्यालयास विश्वास ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे कार्यालय एखाद्या ‘वॉर रूम’ प्रमाणे स्वरूप प्राप्त झाले आहे. युद्धजन्य स्थितीप्रमाणे तेथील टीम बारा तास राबत संमेलनाचे काटेकोर नियोजन करीत आहे.
नाट्य संमेलन असो वा साहित्य संमेलन कार्यकत्यांची मोठी फौज पाठीशी हवी असते. मराठा विद्या प्रसारक समाजाकडे कार्यकत्यांची फौज होती म्हणून या अगोदर २००५ मध्ये नाशिकला झालेले संमेलन यशस्वी होऊ शकले. ती फौज मात्र सध्या लोकहितवादी मंडळाकडे नसली तरी विश्वास ठाकूर पहिल्यापासून संमेलन यशस्वी करण्यासाठी आपल्या सहकार्यांसह २४ तास हे संमेलन यशस्वी करण्यासाठी झटत आहेत.आता संमेलनाच्या पाठीशी भुजबळ नॉलेज सिटीचे कर्मचारी, अधिकारी आता पाठीशी उभे राहिले आहेत.
या अगोदर मात्र कार्यालयातील अमोल जोशी आणि कार्यालयीन प्रमुख दिलीप साळवेकर यांच्या भरवश्यावरच कार्यालयाचे संपर्कासाठी मुख्य कार्यालाय हे कालिदास कलामंदिरातच रहाणार आहे.चहा सांगण्यापासून ते मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यापर्यंत सर्व कामे अमोल जोशी यांनाच करावी लागत होती. कामाचा आवाका जास्त आणि काम करणारा कर्मचारी एक, त्यामुळे संमेलनाचे गाडा पुढे सरकत नव्हता .ही परिस्थिती पाहून संमेलनाचे मुख्य समिती समन्वयक असलेल्या विश्वास ठाकूर यांनी आपल्या बँकेतील कर्मचाऱ्यांची फौज साहित्य संमेलनाचा कामाला लावली. विश्वास हब सेंटर येथे पूर्ण मजल्यावर साहित्य संमेलनाचे उपकार्यालय सुरू झाले आहे. सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत संमेलनाचा गाडा झपाट्याने पुढे सरकतो आहे.आता उपकार्यालयातून कागदोपत्री कामकाज पुढे सरकणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून निमंत्रण पत्रिकेला अंतिम स्वरूप देण्याचे काम या ठिकाणी करण्यात आले.
साहित्य संमेलन आपल्या शहराचे आहे. ते चांगले व्हावे, अशी नाशिकमधील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. मी माझी जबाबदारी ओळखून कामकाज सुरू केले आहे. प्रत्येक स्वयंसेवकाने काम करावे, हीच अपेक्षा आहे. असे मत संमेलनाचे मुख्य समिती समन्वयक विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केले.
विश्वास हब सेंटर येथे पूर्ण मजल्यावर साहित्य संमेलनाचे उपकार्यालय सुरू झाले आहे. सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत संमेलनाचा गाडा झपाट्याने पुढे सरकतो आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांना तेथे मज्जाव करण्यात आला आहे. लोकांच्या विशेष कर्मचाऱ्यांची फौज समित्यांकडून येणाऱ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.अतुल खैरनार ,मनीषा पगारे, राजू देसले ,पूनम काशीकर ,वैष्णवी वझे यांच्यासह या टीम मधील सदस्य ओळखपत्र, जेवणाची कुपन्स, जागेचा आराखडा या सह विश्वास हब मध्ये अहोरात्र काम करून या संमेलनाचा अंतिम आराखडा तयार करत आहेत.त्याचप्रमाणे वैद्यकीय सुविधा, आपत्कालीन व्यवस्था याचे देखील नियोजन करण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरु आहे. या ठिकाणी २० संगणक, २० कर्मचारी कार्यरत आहेत. काम करताना विश्रांतीसाठी तथे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. शहर सुशोभीकरणा साठी देखील आराखडे तयार केले जात आहे. या गतीने काम सुरू राहिले तर या आठवड्यात संमेलनाच्या नियोजनाचे सर्व कामकाज संपेल,असा अंदाज बांधला जात आहे.