नवी दिल्ली : भारतात २०२३ पर्यंत ७५ वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. ७५ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन ते देशवासियांना संबोधित करत होते.वंदे भारत एक्सप्रेस साठी रेल्वे मंत्रालयाने संपूर्ण आराखडा तयार केला असून रेल्वे आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्रत्येक महिन्याला पूर्ण क्षमतेसह ट्रेनचं प्रोडक्शन सुरू करेल. भारतीय रेल्वे प्रत्येक महिन्याला ६ वंदे भारत एक्सप्रेसची निर्मिती करेल.अशाप्रकारे ७५ वंदे भारत एक्सप्रेस देशातील प्रमुख शहरात सुरू होतील असे पंतप्रधानांनी सांगितले.
सध्या दोन वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. पहिली नवी दिल्ली ते वाराणसी आणि दुसरी नवी दिल्ली ते कटरा अशा मार्गावर सुरू आहेत. आता आणखी दोन वंदे भारत एक्सप्रेसची निर्मिती सुरू असून त्या मार्च २०२२ पर्यंत तयार केल्या जातील. ट्रायल आणि सीआरएस क्लिअरेन्सनंतरच त्या सुरू केल्या जातील. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२२ पासून मार्च २०२३ पर्यंत प्रत्येक महिन्याला ६-६ वंदे भारत एक्सप्रेसची निर्मिती केली जाईल.
भारत वंदे एक्सप्रेस सध्या केवळ आयसीएफ चेन्नईमध्ये तयार केल्या जात आहेत. परंतु लवकरच या ट्रेन देशातील आणखी दोन कोन फॅक्टरीमध्ये तयार केल्या जाऊ शकतात. येणाऱ्या नव्या ट्रेनमध्ये, काही बदल केले जाणार आहेत. प्रवाशांच्या अधिक चांगल्या सुविधेसाठी बसायच्या जागांध्ये काही बदल केले जाण्याची माहिती आहे असे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
75 Vande Bharat trains will connect every corner of India in 75 weeks of Amrit Mahotsav of Independence: PM Modi pic.twitter.com/2wIMt6hpXu
— ANI (@ANI) August 15, 2021