स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला काल भारतीय शेअर बाजाराने आजपर्यंतचा उच्चांक गाठला व जणू काही देशांतर्गत आणि जगातील जनतेला भारतात गुंतवणुकीचे आव्हान केलेले दिसत आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेअर बाजारांमध्ये जरी संमिश्र स्वरूपाचे वातावरण असले तरी, अमेरिका आणि एशियन मार्केट भारतीय बंजारा सोबत आहेत असे निर्देश मिळत आहेत, त्याचाच परिणाम दिसत असला तरी , भारतीय शेअर बाजारात मात्र इंडेक्स मॅनेजमेंट योग्य रीतीने सुरू आहे असेच म्हणावे लागेल, त्याला कारण म्हणजे सध्या सोने-चांदी व कच्च्या तेलाच्या किंमती खाली येतांना दिसत आहेत तर शेअर बाजारात विविध क्षेत्रांच्या समभागांमध्ये मागणी येताना दिसत आहे याला मुख्य कारण म्हणजे विविध राज्यांमध्ये लॉक डाऊन च्या नियमांमध्ये दिलेली शिथिलता, लसीकरण, सरकारच्या तिजोरीत विविध मार्गांनी जमा होत असलेला पैसा व स्थानिक आणि विदेशी वित्तीय संस्थांकडून शेअर बाजारात होत असलेली गुंतवणूक ही प्रामुख्याने शेअर बाजारातील चांगल्या प्रतीच्या सर्व भागांमध्ये गुंतवणूक होताना दिसत आहे.
सरत्या आठवड्यामध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ११६९ अंकांनी वधारून ५५४३७ या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २९० अंकांनी वधारून १६५२९ पातळीवर वर बंद झाला तर बारा शेअर्स मिळून तयार झालेला बँक निफ्टी निर्देशांक 360 अंकांनी वधारून 36169 या पातळीवर बंद झाला.
शेअर बाजारात सध्या कभी खुशी कभी गम असे वातावरण असले तरी मात्र तेजीतच बंद होताना दिसत आहे.गुंतवणूकदारांनी बाजारात नेहमी बाय ऑन डीप या तंत्राचा अवलंब करावा व चांगल्या प्रतीचा लार्ज कॅप , मिडकॅप समभागांमध्ये आपली गुंतवणूक करावी त्याच बरोबर उंच स्तरावर नफा वसुली करणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येक तेजीनंतर बाजारात उतार सुद्धा बघायला मिळतात.
बाजाराचे जाणकार हे सुद्धा सांगत आहेत की, आंतरराष्ट्रीय पातळीवर अफगाणिस्तान आणि काबुल या देशांमध्ये वाद आहे याचे जागतिक पातळीवर पडणारे परसाद व भारतावर त्याचे काय परिणाम होतील हा महत्त्वाचा विषय असला तरी शेअर बाजार याला सकारात्मक दृष्टिकोनातून घेऊ शकतो, कारण भारत सध्या जागतिक पातळीवर आपली वेगळी प्रतिमा निर्माण करत आहे त्याचाच परिणाम देशांतर्गत कंपन्यांना याचा फायदा मिळू शकतो आणि त्याचं फलफीत त्यांच्या समभागांच्या किंमतीवर आपल्याला बघायला मिळू शकते त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक विविध क्षेत्रांच्या समभागांमध्ये ठेवून उंच अस्तर असला तरी आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जर नफा भेटत असेल तर तो नफा आपल्या खिशात ठेवून ती रक्कम इतर क्षेत्रांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करायला नक्कीच पाहिजे पण हा कालावधी कमीत कमी एक ते पाच वर्षाचा निश्चित असायला हवा.