सतत येणाऱ्या घामाने तुम्ही त्रस्त आहात का ? ‘हे’ आहेत आयुर्वेदिक उपचार 

डॉ.राहुल रमेश चौधरी यांचा विशेष लेख

0

(डॉ.राहुल रमेश चौधरी) दैनंदिन जीवनात घामाच्या समस्येने त्रस्त झालेले अनेक जण दिसतात.काही लोकांच्या घामाचा वास शेजारच्याला सहन होत नाही इतका वास येतो म्हणजे दुर्गंध येतो तर काहींच्या घामाचे कपड्यांवर डाग पडतात.तर काहींच्या तळहाताला तळपायाला एवढा घाम येतो कि अक्षरश: त्यांच्या हाताच्या ओलेपणामुळे वही अथवा डेस्क अथवा पायातील चप्पल भिजून जातात असे एक आणि अनेक प्रकारच्या समस्या उभ्या राहतात आणि मग अश्या समस्यांवर उपाय शोधण्यास सुरुवात होते त्याचा प्रवास सुरु होतो तो फॉग इत्यादी सारखे डीओडरन्ट्स वापरून…

वेगवेगळ्या कापडाचे शर्ट्स बदलून बघून,जीवनसत्वे घेवून…बाबा-भोन्दू वैद्य-गुगल युनिव्हर्सिटी येथून उपाय घेवून एक ना अनेक प्रकारचे उपाय सुरु होतात पण काही केल्या उपचारात सूर मात्र गवसत नाही..आधुनिक वैद्यकशास्त्राचे औषध घेणे याने तात्पुरते बरे वाटते आणि  पुन्हा परिस्थिती जैसे थे निर्माण होते.अश्या वेळी मात्र रूग्ण सैरभैर होतात आणि मग प्रवास सुरु होतो तो नेहमीच स्वत:च्या अज्ञानामुळे आयुर्वेदाचे उपचारांवर विश्वास नसताना त्याचे उपचार घेण्याचा..हा शेवटचा पर्याय असतो पण यानेच रुग्णांना फरक पडतो व त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटते.अश्या या  घामाचे विकार व आयुर्वेद याविषयी आपण माहिती घेणार आहोत.आजच्या लेखात ..

अ.घाम म्हणजे काय ?घामाचे कार्य कोणते ?
ब.घाम कसा निर्माण होतो?आधुनिक शास्त्र व आयुर्वेदाचा यामागे दृष्टिकोन काय?
क.घामाचे आजार कोणते?व कारणे काय?
ड.त्यावर तपासण्या काय?
.त्यावर आधुनिक व आयुर्वेद शास्त्रानुसार उपचार,पथ्य ,पंचकर्म कोणते याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

१.घाम म्हणजे काय? घामाचे कार्य कोणते ?
……………मला मूत्रशकृत् स्वेदादयोऽपि च॥’’मला: स्वेदस्तु मेदस:।’ घाम म्हणजे शरीरातील मलभाग आहे.यालाच स्वेद म्हणतात.
’क्लेदत्वक्स्नेहरोम धारणै:॥’’स्वेद: क्लेदवत् सौकुमार्यवत्।’ – शरीरावरील केस टिकवून ठेवणे,शरीराचा ओलावा त्याची स्निग्धता टिकवून ठेवणे हे घामाचे काम आहे.
’स्वेदस्य क्लेदविधृती।’क्लेद म्हणजेच स्निग्धतेचे धारण करणे.हे कार्य स्वेदाचे आहे.

२.घाम कसा निर्माण होतो?
आधुनिक शास्त्र व आयुर्वेदाचा यामागे दृष्टिकोन काय ? -घामाची निर्मिती आधी आपण आयुर्वेद शास्त्रानुसार बघूयात.आयुर्वेद शास्त्रानुसार अन्नाचे स्थूलपचन व सूक्ष्म पचन असे दोन भाग पडतात.यामध्ये आपण जे काही अन्न घेतो त्यापासून सुरुवातीला आहाररस निर्माण होतो त्यानंतर त्या आहाररसाचा वापर करून पुढे सात धातु त्यांचे स्वत:चे पोषण करून घेतात.हे सूक्ष्म पचनातून घडते पण जेव्हा उर्वरीत रसाचे सार भाग व मल भाग असे दोन भाग तयार होतात तेव्हा मल भागापासून म्हणजेच स्थूल पचनातून मूत्र(लघवी),स्वेद(घाम),पुरीष भाग तयार होतो.तसेच घाम(स्वेद),रक्त हे दोघेही पित्ताच्या आश्रयाने राहतात.तसे पाहता आयुर्वेदात मलसंख्या,मलनिर्मिती,मल संज्ञा ही संकल्पना अतिशय विस्तृत आहे.याचे विवेचन इथे शक्य नाही.पुढे जेव्हा मल संकल्पना हा नवीन लेखात बघू त्यात आपण याची सविस्तर माहीती बघू.

आयुर्वेदात स्वेदवह स्त्रोतस(स्वेद वाहून नेणारे-तयार करणारे चॅनल्स),
स्त्रोतस दुष्ट करणारे हेतु(factors affecting for vitiation),तसेच त्याची लक्षणे देखील वर्णन केली आहेत.
”स्वेदवहानां स्त्रोतसां मेदो मूलं लोमकूपश्च॥“
स्वेदाची निर्मिती व वाहून नेण्याचे कार्य मेद धातु,व रोमकुप् आहेत.

आधुनिक शास्त्रानुसार स्वेद संकल्पना व निर्मिती-त्वचेच्या खालील भागात स्नेह ग्रंथी व स्वेद ग्रंथी असतात.या सर्व ग्रंथी केसाच्या मूळाच्या आजूबाजूला पसरलेल्या असतात,त्याखाली मेदाचा म्हणजेच मेद धातुचा स्तर असतो.त्वचा ही शरीर उष्म्याचे नियंत्रण करते व हे नियंत्रण स्वेदामार्फत केले जाते.स्वेद ग्रंथी व स्नेह ग्रंथी या दोन्ही बाह्यस्त्रावी ग्रंथी आहेत.आयुर्वेद विज्ञानानुसार स्वेदवह स्त्रोतसात स्वेद व स्नेह ग्रंथी दोन्हीचा समावेश आहे..ज्यावेळी व्यायाम इत्यादी कारणे जी आपण वर बघोइतली ती जेव्हा घडतात,त्यावेळेला वातावरणातील उष्मा व शारीर उष्मा याने त्वचा मधील कोशिकांचा रक्तप्रवाह वाढतो परिणामी अतिवर्धित रक्तप्रवाहाने स्वेदस्त्राव होतो.वाढलेला स्वेदस्त्राव वाऱ्याच्या बाहेरील स्पर्शाने बाष्पीभूत होवून नाहीसा होतो.व बाष्पीभवनाकरीता अपेक्षित उष्मा त्वचेमार्फत मिळ्तो.असेच याच्या विरुध्द शीत गुणाने होते.

त्वचेवर असंख्या रोमकुपे अस्तित्वात असतात.स्वेदग्रंथीच्या स्त्रावात ९९% पाणी(जलस्त्राव) व १% युरीया (घनस्त्राव)इत्यादी घटक असतात.तळहात व तळपाय येथे स्वेदग्रंथी अतिप्रमाणात असतात.यौवनावस्थेत काख,जननेंद्रिय,स्तनप्रदेश येथे अत्यधिक स्वेद म्हणजे घाम येतो येथे स्वेद ग्रंथी मोठ्या आकाराच्या असतात.

३.स्वेदाचे शरीरातील प्रमाण?
-मानवी शरीरारत उदकाचे म्हणजेच जलाचे प्रमाण १० अंजली इतके सांगितले आहे यामध्ये घामाचा अतर्भाव होतो पण आयुर्वेदानुसार व आधुनिक शास्त्रानुसार ठराविक प्रमाण वर्णित नाही..१ अहोरात्रात जर कमीत कमी किंवा २ पाउंड च्या आसपास घाम येत असेल तर स्वेदाची म्हणजेच विकृत अवस्था समजावी.

४.घामाचे आजार कोणते ?
-घामाचे आजार आयुर्वेदा नुसार घामाची वाढ व घामाचा क्षय यावर ठरतात.याआधी आयुर्वेदानुसार घामाच्या आजारांची कारणे बघूयात.

स्वेदाची निर्मिती व वाहून नेण्याचे कार्य करणाऱ्या या स्त्रोतसाला दुष्ट करणारी कारणे कोणती ?
“व्यायामात् अतिसंतापात् शीतोष्णक्रमसेवनात्।
स्वेदवाहीनी दूष्यन्ति क्रोधशोकभयैस्तथा॥“
-अतिप्रमाणात व्यायाम करणे-अतिप्रमाणात उन्हात फिरणे,उन्हात काम करणे,अतिप्रमाणात मानसिक ताप करून घेणे.-थंड उष्ण असे एकामागोमाग एक आलटून पालटून नेहमीच खाणे.-राग,दु:ख अतिप्रमाणात करणे-खूप प्रमाणात घाबरणे.-Diabetes-hyperthyroidism-menopause-some cancer types
या सर्व कारणांनी स्वेदवह स्तोतस म्हणजे घामाची निर्मिती व वहन करणारे स्त्रोतस दुष्ट होते.यामुळे दूषित झालेले स्वेदवह स्त्रोतस घामाला दूषित करते व अनेक प्रकारचे आजार उत्पन्न करते.

”त्वगदोषा: संकोऽतिप्रवृत्तिर्वा मलायना दोषा:।
“घाम दूषित झाल्याने पीडका,रुक्षताअ,दौर्गंन्ध्य,वात-मूत्र-पुरीष अवरोध,अतिसार,मधुमेह,अतिस्वेदप्रवृती
अश्या स्वरूपाचे अनेक आजार उत्पन्न होतात
अ.घामाची वृध्दी(वाढ)स्वेदोऽतिस्वेददौर्गंन्ध्यकण्डू:।
अतिप्रमाणात घामाने दुर्गंधता व कण्डू हे त्रास होतात.
ब.घामाचा क्षयस्तब्धरोमकूपता रोमच्यवनत्वक परिपाटन स्वापपारूष्य स्वेदनाशै: स्वेद:।स्वेदक्षये स्तब्धरोमकुपता त्वकशोष: स्पर्शवैगुण्य स्वेदनाशश्च। तत्राभ्यंग स्वेदोपयोगश्च॥
घाम अतिशय कमी प्रमाणात झाल्यास त्वचेवरील केस गळतात,त्वचेला कोरडेपणा येतो,त्वचेला सुप्तता येते,त्वचा फुटते,स्वेद नाश होणे या प्रकारचे लक्षणे दिसतातक.विविध प्रकारचे त्वचा विकारइसब,नायट्यासारखे,कुष्ठ इत्यादी.

आधुनिक शास्त्रानुसार कोणते आजार घामाच्या क्षय व वृध्दी मुळे होतात?
-fungal infections
-various skin diseases
-bad body odour(bromhidrosis)
-warts-bacterial infections
-athelete foot(tinea pedis) fungal infection type
-joch itch(tinea cruristype of fungal infection
-maceration
-skin continue moistened
-social and emotional complation

५.आधुनिक व आयुर्वेद शास्त्रानुसार उपचार,पथ्य ,पंचकर्म कोणते?
आयुर्वेदानुसार उपचार–“…तत्राभ्यंग स्वेदोपयोगश्च।““व्यायाम अभ्यंजनस्वेदमद्यै: स्वेदक्षयोद्भवान्।अभ्यंग व्यायाममद्य स्वप्ननिवात ….॥”
आयुर्वेदानुसार शीतल तेलाचे अभ्यंग (चन्दनबला लाक्षादी तेल्,हिमसागर तेल् इत्यादी),उद्वर्तन ,शीत स्थानी निद्रा हे घाम कमी करणासाठी तर व्यायाम अरिष्ट सेवन इत्यादी घाम येत नसेल याकरीता उपचार वर्णन केले आहे.तसेच कामदुधा रस,प्रवाळपिष्टी,गोदंती,त्रिभुवनकिर्ती,लोध्र,चन्दन,इत्यादी प्रकारची औषधे घाम कमी करणे व येत नसेलतेव्हा वेगवेगळ्या प्रकारे वापरली जाते.

पंचकर्म-
अ.उद्वर्तन-उद्वर्तन म्हणजे शरीरावर चुर्ण औषधे रगडणे यामध्ये लोध्र,उशीर,वाळा,चंदन,नागरमोथा,दारुहरिद्रा इत्यादींचा सामवेश होतो.उद्वर्तन घामाचे प्रमाण कमी करणास मदत करते.
ब.विरेचनस्वेद पित्त रक्त मेद यांचा एकमेकांशी संबधा आहे त्यामुळे यामध्ये पित्त व रक्त व मेद धातु व दोषातील विकृती काढावयाची असल्यास विरेचन पंचकर्म करावे.पथ्यपालन-अतिप्रमाणात घाम येणे या रुग्णांनी तिखट,खारट,आंबट पदार्थ,अत्यधिक प्रमाणात व्यायाम,क्रोध,शोक्,भीती टाळावी याविरुध्द घाम न येणाऱ्याअंनी याचे ठराविक मात्रेत सेवन करावे.

आधुनिक उपचार-
1.antidepressants medicine
-nerve blocking medication
-proper clothing
-astringent application
-microwave therapy
-swat gland removal terapy
-nerve surgery
-wear natural material maid shoes and socks
-daily take baha
-bolulinum toxin injections
-glycopyrolate
-drysol like creamsTreatment for hypersweating use in modern technology/science

अश्या प्रकारे आपण घामाचे विकार व आयुर्वेदाविषयी अगदी थोडक्यात माहीती घेतली.यावर काहीही शंका असल्यास खालील मोबाईलनंबर वर संपर्क साधावा.
डॉ.राहुल रमेश चौधरी
एम्.डी.(आयु.),मुंबई
एम.ए.(संस्कृत),पुणेसहाय्यक प्राध्यापक ,
श्री सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यलय व रुग्णालय,नाशिक
मोबाईल-९०९६११५९३०

Dr.-Rahul-Ramesh-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.