जिल्ह्यात सद्यस्थितीत १,१०५ रुग्णांवर उपचार सुरू : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६१ %

0
नाशिक – नाशिक जिल्ह्यासह राज्यातील २५ जिल्हे अनलॉक होणार असल्याचा प्रस्ताव असला तरी हा निर्णय एक ते दोन दिवसात होणार आहे.नाशिक जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी कोरोना बाधितांनाची संख्या मोठ्या प्रमाणात होती. प्रशासनाचे नियोजन त्याला नागरिकांनी केलेले सहकार्य या मुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता १ हजाराच्या जवळ येऊन ठेपला आहे.
जिल्ह्यात लसीकरणासाठी नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. परंतु सरकारी दवाखान्यात पहाटे पासून रांगा लावून ही अनेकांना लस मिळत नाही तर खाजगी रुग्णालयात लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
 
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९२ हजार ९६९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  सद्यस्थितीत १ हजार १०५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ५१३  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
 
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
 
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २४,  बागलाण १८, चांदवड ३५, देवळा १०, दिंडोरी ३०, इगतपुरी २९, कळवण ०७, मालेगाव ३७, नांदगाव २१, निफाड ८६, पेठ ०१, सिन्नर ९५, सुरगाणा ००, त्र्यंबकेश्वर ०३, येवला ४६ असे एकूण ४४२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ६०३ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ५३ तर जिल्ह्याबाहेरील ०७  रुग्ण असून असे एकूण १ हजार १०५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख २ हजार ५८७ रुग्ण आढळून आले आहेत.
 
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
 
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९७.०२ टक्के, नाशिक शहरात ९८.०१ टक्के, मालेगाव मध्ये ९६.७४ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.६१ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.६१  इतके आहे.
 
एकूण मृत्यु :
 
नाशिक ग्रामीण ४ हजार ८७ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३ हजार ९४३  मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५७ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ५१३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 
 
लक्षणीय :
 
४ लाख २ हजार ५८७ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३ लाख ९२ हजार ९६९  रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
 
सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले  १ हजार १०५ पॉझिटिव्ह रुग्ण.
 
जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.६१ टक्के.
 
 
(वरील आकडेवारी  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.