काबुल मधून २९० भारतीयांना सी -17 विमानाने भारतात आणण्याचा प्रयत्न सुरु

0

काबूल : अफगाणिस्थानात तालिबानने सत्ता स्थापन केल्यानंतर तेथे सुरु असलेल्या संघर्षा नंतर अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना देशात आणायचे प्रयत्न सुरु आहे.आज अफगाणिस्तानातून काबुलहून येणाऱ्या भारतीय हवाई दलाचे आणखी एक सी -17 विमान आज (20 ऑगस्ट) गाझियाबादमधील हिंदान हवाई तळावर उतरू शकते असे सूत्रांकडून समजले आहे . या वेळी अफगाणिस्तानात अडकलेल्या २९० लोकांना सी -17 विमानाने भारतात आणले जाऊ शकते, अशी माहिती आहे. या २९० लोकांपैकी २२० भारतीय आणि ७० अफगाणिस्तानचे नागरिकआहेत.

यावेळी सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, ऑपरेशन एअरलिफ्ट २ मध्ये काही अफगाणिस्तानचे खासदारही भारतात येऊ शकतात. हे विमान हिंडन एअर बेसवर कधी उतरेल याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही, परंतु या लोकांना येथे घेण्यासाठी ५ बस सकाळी हिंडन एअरबेसवर पोहोचल्या आहेत.

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांशी संपर्क साधला जात आहे आणि दूरच्या भागात अडकलेल्या लोकांसाठी अडचणीचे वृत्त आहे. अफगाणिस्तानच्या शेजारील देशांमधूनही विमानांची व्यवस्था केली जात आहे आणि हे ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी भारत सर्व मित्र देशांशी सतत संपर्क सुरु आहे.

अफगाणिस्तानमधील एकूण भारतीयांची संख्या अद्याप उपलब्ध नसली तरी तेथे ४०० ते ५०० भारतीय नागरीक असल्याचा अंदाज आहे. विमानतळावर पोहोचलेल्या सर्व भारतीयांसाठी हवाई दल मोहीम सुरू आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.