मुंबई,दि, १२ ऑक्टोबर २०२४ –अजित पवार गट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या गोळीबाराच्या घटनेमध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आहे.हा हल्ला झाला तेव्हा सिद्दीकी निर्मल नगर भागातील आपल्या कार्यालयातून निघून गाडीत बसले होते. तो वाहनात बसताच अचानक फटाके वाजायला लागले त्यामुळे हल्लेखोरांनी लपून त्यांच्यावर गोळीबार केला आरोपींची एकूण चार राउंड फायर केले गोळीबार करणारे तीन आरोपीना तातडीने अटक करण्यात आली आहे.या हल्यासाठी सुपारी देऊन हत्या करण्यात आली असावी अशी माहिती पोलीसा कडून देण्यात येत आहे. घटनेची माही समजताच उप मुखमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस रुग्णालयात दाखल झाले आहेत. आरोपींना कडक शासन करणार अस हि त्यांनी सांगितले.
एसआरए प्रकल्पाच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन ते चार राऊंड फायर करण्यात आले. यातील एक गोळी त्यांच्या छातीला लागली. यानंतर त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे बाबा सिद्धिकी हे ज्येष्ठ नेते आहे. बाबा सिद्धिकी यांनी नुकतंच काँग्रेसला रामराम ठोकून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. १२ फेब्रुवारी २०२४ ला बाबा सिद्धिकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. बाबा सिद्धिकी हे १९९९, २००४ आणि २००९ साली सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तर बाबा सिद्धिकी यांनी राज्यमंत्री पदाची देखील धुरा सांभाळली होती.