
मुंबई | दि. ७ जानेवारी २०२५–Badlapur Fire ठाणे जिल्ह्यातील बदलापूर पूर्व येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागल्याची खळबळजनक घटना मंगळवारी घडली. या स्फोटानंतर आगीचे लोळ आकाशात झेपावले असून संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
एमआयडीसीमधील पॅसिफिक केमिकल कंपनीत अचानक झालेल्या स्फोटानंतर (Badlapur Fire)काही क्षणांतच आग भडकली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ ते १० गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत असून परिसरात अजूनही लहान-मोठे स्फोट होत असल्याची माहिती आहे.
आगीच्या तीव्रतेमुळे कंपनी परिसरातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट दूरपर्यंत दिसत आहेत. संभाव्य धोका लक्षात घेता एमआयडीसी परिसरातील नागरिकांसह जवळील औद्योगिक वसाहतीतील कामगारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.घटनेनंतर स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती. मात्र पोलिस आणि प्रशासनाकडून परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सध्या आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, या स्फोटात किती नुकसान झाले किंवा कोणतीही जीवितहानी झाली आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र स्फोटाच्या आवाजाने आणि आगीच्या तीव्रतेमुळे संपूर्ण बदलापूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
व्हिडीओ पहा


[…] बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट; ए… […]