भाजपाच्या २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर :नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे यांना पुन्हा संधी

0

मुंबई,दि,२६ ऑक्टोबर २०२६- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने २२ उेमदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यापूर्वी, ९९ उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली होती. त्यामुळे, भाजपकडून आत्तापर्यंत १२१ उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. नाशिक मध्यमधून वेटिंगला असलेल्या देवयानी फरांदे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

भाजपच्या दुसऱ्या यादीतही देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतील नेत्यांनाच संधी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत भाजच्या दुसऱ्या यादीत जतमधून गोपीचंद पडळकर यांना संधी देण्यात आली असून अकोल्यातून विजय अग्रवाल यांना उमेदवारी मिळाली आहे.

पुण्यातील तीन मतदारसंघात उमेदवार जाहीर झाले असून खडकवासलामधून भीमराव तापकीर, पुणे कंन्टोनमैंट मतदारसंघातून सुनिल कांबळे, कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मतदारसंघातून समाधान औताडे यांना तिकीट देण्यात आलंय. त्यामुळे, प्रशांत परिचारक यांना संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे. भाजपने जारी केलेल्या दुसऱ्या यादीमध्ये विदर्भातील ९ मतदार संघाचा समावेश आहे. तर, पुण्यातून तीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

मात्र, भाजपच्या दुसऱ्या यादीत मुंबईतील एकही नाव नाही. दरम्यान, गोपीचंद पडळकर यांना जत विधानसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जत जनसंपर्क कार्यालयात सहकाऱ्यांनी पेठे भरवून अभिनंदन केले.

BJP candidate list/Second list of 22 BJP candidates announced: Devyani Farande gets another chance from Nashik Central

BJP candidate list/Second list of 22 BJP candidates announced: Devyani Farande gets another chance from Nashik Central

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.