राहुकाळ – दुपारी १२.१९ ते दुपारी १.४४
नक्षत्र – अश्विन कृ . ११
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) घरात वाद विवाद संभवतात. नमते घ्या. शत्रूचा त्रास जाणवेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्रगती उत्तम होईल. सौख्य लाभेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) खर्चात टाकणारा दिवस आहे. मनाची शांतता ढळू देऊ नका. उपासना करा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मन अस्वस्थ राहील. भय दाटून येईल. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. उपासना करा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) नियोजन चुकेल. कामात अडथळे येतील. मनाची अवस्था प्रतिकूल आहे.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत अनुकूल दिवस आहे. संधीचे सोने करा. वेळ दवडू नका.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) दिवस अनुकूल आहे. सौख्य लाभेल. मात्र नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) वरिष्ठ नाराज होतील. राजकारणात सावध रहा. चुकीची कामे होऊ देऊ नका.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रतिकूल दिवस आहे. पीडादायक अनुभव येऊ शकतात. आरोग्य संभाळा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) दोषारोप होऊ शकतात. मात्र प्रेमात यश मिळेल. खुशखबर चालून येईल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उत्तम लाभाचा दिवस आहे. नवनवीन कल्पना सुचतील. धाडसी निर्णय घ्याल. आर्थिक प्राप्ती चांगली होते आहे.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) नियोजन चुकेल. कामात अडथळे येत आहेत. अधिक मेहनत घ्या. निराश होऊ नका.