शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर :देवळाली मधून योगेश घोलप यांना संधी
धुळ्यामधून अनिल गोटे यांना तर शिवडी मधून अजय चौधरी यांना उमेदवारी
मुंबई,दि,२६ ऑक्टोबर २०२४ –महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यातील सर्वंच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान शिवसेना ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी १५ उमेदवारांची यादी जाहीर करून बाजी मारली आहे.महाविकास आघाडीचा ८५-८५-८५ चा फॉर्मुला ठरला होता त्यापैकी शिवसेना ठाकरे गटाने या आधी ६५ उमेदवार जाहीर केले होते आजची यादी मिळून ठाकरे गटाने एकूण ८० उमेदवार जाहीर केले आहेत.
नाशिकच्या देवळाली मतदार संघातून योगेश घोलप यांना संधी दिली आहे.भायखळा विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाच्या विद्यामान आमदार यामिनी जाधव यांच्याविरुद्ध ठाकरे गटाने मनोज जामसुतकर यांना उमेदवारी दिली आहे.तर धुळ्यामधून अनिल गोटे यांना उमेदवारी जाहीर केले आहे.
शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर
१) धुळे शहर- अनिल गोटे
२)चोपडा (अज)- राजू तडवी
३) जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन,
४) बुलढाणा- जयश्री शेळके,
५) दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल
६) हिंगोली- रूपाली राजेश पाटील
७) परतूर- आसाराम बोराडे
८) देवळाली- योगेश घोलप (अजा)
९)कल्याण पश्चिम- सचिन बासरे
१० )कल्याण पूर्व – धनंजय बोडारे
११) वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव
१२ ) शिवडी- अजय चौधरी
१३) भायखळा- मनोज जामसुतकर
१४) श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे
१५) कणकवली- संदेश भास्कर पारकर.
महाविकास आघाडीचे ९०-९०-९० फॉर्म्युला-
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नवी दिल्लीत आहेत. बाळासाहेब थोरात यांनी नवी दिल्लीत बोलताना महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला सांगितला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात देखील थोरात यांनी भाष्य केलं आहे. मित्रपक्षांना आम्ही १८ जागा दिलेल्या आहेत. आता तीन राजकीय पक्षांचा फॉर्म्युला ८५-८५-८५ वरुन ९०-९०-९० वर पोहोचला असल्याचं त्यांनी म्हटलं.