मुंबई : अंतरा आणि मल्हारच्या नात्याला प्रत्येक टप्प्याला वेगळं वळण मिळत आहे. प्रत्येक क्षणाला कुठेतरी नियती संदेश देत आहे की, मल्हार आणि अंतराने एकत्र यावे. नियतीच्या मनात नक्की काय आहे हे कोणीच सांगू शकत नाही. अगदी तसंच अंतरा आणि मल्हारच्या नात्याबद्दल झाले आहे. दुसरीकडे, श्वेताचं सत्य चित्रा काकीला माहिती असंल तरीदेखील तिची प्रत्येक खेळी, तिचा प्रत्येक डाव उलटा पडत आहे. तुला दानाच्या वेळेस श्वेताचं सत्य सगळ्यांसमोर येता येता राहिलं. नुकतच चित्रा काकीने श्वेतावर नजर ठेवण्यासाठी एक गुप्तहेर ठेवला पण त्यानेदेखील श्वेताच पाठलाग न करता अंतराचा पाठलाग केला. कुठेना कुठे वाटतं होतं की यावेळेस श्वेताचं सत्य सगळ्यांसमोर येणार पण यावेळेस देखील चित्रा काकीचा प्लॅन फसला. श्वेता आणि मेघच्या नात्याबद्दल अजूनही कोणालाच काहीच माहिती नाहीये. ते म्हणतातना खोटं कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी देखील ते एक ना एक दिवस समोर येतंच. पण आता श्वेताचा अंतराबद्दल गैरसमज झाला आहे. श्वेताला असं वाटतं आहे की, अंतरा मल्हारला भेटायला गेली, खरं बघायला गेलं तर असं काही अंतराच्या मनामध्ये देखील नाही. तिचा खरंच गैरसमज झाला आहे का ? नक्की काय आहे श्वेताच्या मनात ?
उद्याच्या भागामध्ये या झालेल्या गैरसमजामुळे श्वेता स्व:ताच आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. श्वेता हे सगळं नाटक करते आहे का ? श्वेताचं असं वागणं तिलाचं कुठल्या मोठ्या संकटात नाही ना टाकणार ? यामधून अंतरा तिला कशी वाचवेल ? श्वेता आणि मेघचं सत्य मल्हार आणि श्वेताच्या लग्नाआधी सगळ्यांसमोर येईल ? काय होईल मालिकेमध्ये बघा जीव माझा गुंतला उद्या रात्री ८.३० वा. कलर्स मराठीवर !