रत्नागिरी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त विधाना नंतर नारायण राणे यांना अटक केली असून त्यांना नाशिक पोलीस न्यायालयात हजर करणार आहेत.नारायण राणे यांना ताब्यात घेण्याआधी त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे .
नारायण राणे आता सध्या संगमेश्वर पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केल होते .या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. नाशिक, पुणे, महाडसह अनेक ठिकाणांहून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एका केंद्रीय मंत्र्याला अटक करण्यात येण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच वेळ आहे.