रत्नागिरी – नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केल्या नंतर नारायण राणेंवर ४ ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. नारायण राणे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस आता रत्नागिरीत पोहचले आहेत. नारायण राणे यांनी रत्नागिरी कोर्टात अटकपूर्व जमीन अर्ज केला होता तो अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
त्याच बरोबर मुंबई हायकोर्टाने नारायण राणे यांच्या अटक पूर्व जामिनावर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे नारायण राणे यांना रत्नागिरीत अटक होण्याची शक्यता आहे. ?