शिवसेना कार्यकर्त्यांना कडक शिक्षा करा भाजपाचे पोलीस आयुक्तांना निवेदन 

0
नाशिक – भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांत संयम असून भाजपा लाठया काठया व दगडांनी दहशत पसरविणाऱ्या दृष्ट व समाज विघातक प्रवृत्तींचा तीव्र निषेध करते असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस आ.देवयानी फरांदे यांनी केले. त्या भाजपा कार्यालयावर दगड विटांचा वर्षाव करून कार्यालयाची तोडफोड केल्या नंतर त्यांनी  कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद करतांना केले. 
 
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष गिरीष पालवे, महापौर सतिष नाना कुलकर्णी, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, आ.सीमा हिरे, आ.राहुल ढिकले, पवन भगुरकर, सुनिल केदार, जगन अण्णा पाटील, प्रदिप पेशकार, ॲड.श्याम बडोदे, भाजपा ज्येष्ठ नेते विजय साने, दिनकर अण्णा पाटील, रोहिणी नायडू, शहर उपाध्यक्ष कुणाल वाघ, माधुरी बोलकर, प्रियंका माने,  मंडल अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते. 
 
यावेळी आ.देवयानी फरांदे म्हणाल्या की, पोलीस प्रशासन हे महाविकास आघाडीच्या (राज्य शासनाच्या) दबावाखाली काम करत आहे. तसेच महाराष्ट्रभर गुंडगिरीचे दर्शन घडत आहे. सरकार गुंडांना पाठीशी घालत आहे असे सांगून सत्तेचा वापर करून दबाव तंत्र चालू आहे असे त्या म्हणाल्या 
 
गिरीष पालवे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत अनेक वेळा अपशब्द वापरले गेले. तरी ही भाजपा कार्यकर्त्यांनी भाजपाच्या संयमी संस्कृतीचे दर्शन घडवीले व अपशब्द वापरला नाही. यापुढेही भाजपा कार्यकर्त्यांनी असाच संयम बाळगावा, योग्य वेळ आल्यावर भाजपा समाजविघातक व दहशद पसरविणाऱ्या प्रवृत्तीना योग्य मार्गाने योग्य तो धडा देईल असे ते म्हणाले. भाजप कार्यकर्ते संयमाने वागणारे असून ते कायदा हातात घेऊन शांततेला कधीच गालबोट लागू देणार नाही असे शेवटी गिरीश पालवे म्हणाले.
 
विजय साने आपल्या भाषणातून शिवसेना कार्यकर्ते येत्या महापालिका निवडणूका डोळयापुढे ठेवून दहशत निर्माण करण्याचे काम करीत आहे परंतू नाशिक सुज्ञ जनता या दहशदीला कदापी बळी पडणार नाही असे ते म्हणाले. यावेळी ही प्रचंड मतांनी भाजपाची एकहाती सत्ता येईल.
 
तत्पुर्वी नाशिक भाजपा महानगरातर्फे मा. पोलीस आयुक्त, नाशिक यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनात म्हटले आहे की,  भाजपा नाशिक कार्यालयावर भ्याड हल्ला केल्याबद्दल शिवसेना कार्यकर्त्यांना कडक शिक्षा करण्यात यावी. अशी मागणी करून निवेदनात पुढे म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री मा.ना.श्री.नारायण राणे यांच्या विरोधातली आपण केस नोंदवून घेतली व त्यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस अधिकारी रवाना झाल्यामुळे महाराष्ट्रभर वातावरण तापायला सुरुवात झाली.
 
त्यांतच साधारण: सकाळी 10.00 वाजता बाळा दराडे व दिपक दातीर व  शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी कार्यालयावर हल्ला केला, दगडफेक केली. आमचे कार्यालयीन कर्मचारी (स्टाफ) कार्यालयात काम करीत होते. मोठे मोठे दगड फेकल्यामुळे जिविताला धोका होऊ शकला असता. हा त्यांचा खुन करण्याचा प्रयत्न होता
 
 तरी नाशिक भाजपा कार्यालयावर शिवसेना कार्यकर्त्यांना केलेल्या भ्याड हल्याबाबत त्यांच्यावर कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.