पोटाचे विकार होण्याची कारणे ?आयुर्वेदिक पद्धतीने कसे औषध उपचार करता येतात 

0

डॉ.राहुल रमेश चौधरी
जग आधुनिकीकरणा कडे जात आहे. तंत्रज्ञाच्या जोरावर आपल्या एका क्लिक वर सर्व माहिती आपल्या उपलब्ध होत आहे. मनोरंजना साठी सर्व प्लॅटफॉम आपल्या मोबाईलवरच उपलब्ध होत आहेत. त्यामुळे आजकाल बैठे काम वाढले आहे त्यामुळेच अनेकांचे व्यायाम शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत ,काही जण तर घरकाम देखील करत नाहीत  या गोष्टी न करण्याने पोट साफ न होण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत.या काय तक्रारी आहेत त्या आपण जाणून घेऊ या त्यामुळे पोटाचे काय विकार होण्यास सुरुवात होते ते ही आजच्या लेखात जाणून घेऊ या तसे बघायला गेले तर हा विषय अतिशय विस्तृत आहे.पण आज आपण थोडक्यात या विषयाची माहिती बघणार आहोत.

काय आहेत पोटाच्या तक्रारी 
१.योग्य वेळेला शौचास न होणे
२.शौचास चिकट होणे
३.आव पडणे
४.रक्त पडणे
५.शौचाच्या वेळेस कुंथावे लागणे
६.शौचास भसरट होणे
७.शौचास दुर्गंध येणे
८.शौचास कडक होणे
९.शौचास सुरुवातीला कडक होणे नंतर पातळ होणे
१०.कधी घट्ट होणे कधी पातळ होणे
११.शौचास खडे तयार होणे
१२.शौचास अजिबात न होणे
१३.शौचाच्या जागी आत आग होणे,खाज सुटणे
अशा एक ना अनेक तक्रारीचा समावेश होतो.या आधीच्या लेखमालामध्ये आपण पचन संस्था कशी कार्य करते …दोष,धातू,मल म्हणजे काय याची माहिती बघितली.या लेखात पुन्हा एकदा आपण त्यातीला मल निर्मितिचा भाग बघू्यात.

मल निर्माण प्रक्रिया –
आहार सेवन केल्यानंतर घेतलेल्या आहाराचे जीभेपासूनच पचनाच्या प्रक्रियेस सुरुवात होते.घेतलेल्या आहाराचे चर्वन केल्यानंतर म्हणजेच चावून खात असताना त्यात लाळ व लाळेतील पाचक  घटक एकत्रितहोतात.तेथून आहार अन्ननलिकेमार्फत आमाशया त प्रवेश करतो…तेथे आहार साधारणत: १ तासापर्यंत स्थित असतो..तेथे आमाशयातील पाचक रस त्यात एकत्रित होतात..तेथून आमाशयातील सुपाचित आहार लहान आतड्याच्या ठिकाणी येतो येथे साधारणत: १ ते ११/२ तास आहार स्थित असतो.तेथे यकृता कडून आलेले पित्त एकत्रित होवून पचन होते.येथून सूक्ष्म पचनास प्रारंभ होतो.या सूक्ष्म पचनातून सर्व जीवनसत्व  इत्यादी ची पूर्ति  होते.सर्व धातुचे पोषण देखिल होते.त्यानंतर उर्वरीत आहाररसाचे स्थूल पचनाकरीता मोठ्या आतड्यात सुरुवात होते येथे सार किट्ट  विभाजन सुरु होवून पुरीष,मूत्र ,स्वेद निर्मिती होते त्यातील एक भाग म्हणजे पुरीष. .या पुरीष मलाला आपण पुढे जे कारण बघणार आहोत ते पचन विकृत करून अजून विकृत करतात. त्याची कारणे खालीलप्रमाणे

१.नेहमी भूक नसताना जेवण करणे
२.थोड्या थोड्या वेळाने एकावर एक म्हणजेच आधीचे पचन झालेले नसताना खाणे
३.अजीर्ण झालेले असताना जेवण करणे
४.जेवणानंतर भरपूर पाणी पिणे किंवा जेवणाच्या आधी भरपूर पाणी पिणे
५.जेवढी भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे
६.जेवणच न करणे
७.अतीप्रमाणात जड किंवा हलके अन्न सेवन करणे
८.विविध आजारामध्ये  अग्नि मंदावूनपचन विकृत होने उदा.appendicitis, hypothyroidism, यकृताचे विकार,मज्जारज्जुचे विकार इत्यादी
९.योग्य वेळी न जेवणे
१०.जेवताना अतिशय थंड पाणी पिणे
११.बी १२ सारख्या जीवनसत्वाची कमतरता असणे
१२.शौचास संवेदना आली असताना शौचास न जाण्याच्या वाईट सवयिमुळे मज्जातंतूमार्फत स्नायूना मिळणाऱ्या संवेदना कमी होणे
१३.पाण्याचे सेवन गरजेपेक्षा कमी असून तंतुमय पदार्थांचा आभाव यामुळे आतड्याची हालचाल मंदावणे
१४.नियमीत व्यायामाचा अभाव असणे
१५.कायम बैठे काम असणे
१६.अतीप्रमाणात मैथुन करणे
१७.अतीप्रणामात मांसाहार करणे
१८.विविध औषधाचे सेवन उदा.लोहाचे औषधे,झोपेच्या गोळ्या,कोडीन,मोर्फिन इत्यादी
१९.जठरातील  व्रण
२०.विविध दाताचे विकार
२१.शिसे सारख्या धातूची विषाक्तता
२२.गुद दवाराचे आजार उदा.मूळव्याध ,फिशर इत्यादी
२३.अतीप्रमाणात उपवास करणे
२४.लहान मुलामध्ये दूध,व बेकरीचे पदार्थ अतीप्रमाणात सेवन करणे
२५.जेवणामध्ये खाद्यतंतुचे प्रमाण कमी असणे
२६.मानसिक भीती व मानसिक आजार
२७.गर्भारपणासारखी कारणे
२८.गुदद्वार विकृती,हर्शस्प्रूङ् आजार,आंत्रा चा अवरोध,फिशर,मूळाव्याध,
२९.सतत पोट साफ होण्याची औषधे घेणे
३०.सुंठ,जायफळ याचे आत्याधिक सेवन करणे
३१.वारंवार चहा कॉफी घेणे
३२.तुरट पदार्थ वारम्वार् खाणे
३३.चिवडा,फरसान,शेव,तेलकट पदार्थ,वरी,लाह्या,नाचणी,राजगीरा,फुटाने,भाकरी,कोरड्या चटण्या याचे नित्य सेवन करणेअश्या प्रकारे अनेक प्रकारची कारणे मलावरोध घडवून आणण्यास कारणीभूत ठरतात.

या मलावरोध आजाराची लक्षणें बघू्यात
१.मन सतत  उदास असणे
२.छाती पोट तसेंच पूर्ण कोष्ठाचा भाग दुखणे
३.शौचाच्या जागी वेदना होणे
४.भूक अजिबात न लागणे
५.पोटऱ्या,मांड्या दुखणे
६.पित्ताचे वाता चे त्रास होने
७.नख,नेत्र,त्वचा रूक्ष ,कोरडी फिकट पडणे
८.कडक शौचास होणे
९.शौचातून रक्त आव पडणे
१०.दात किडणे,नखाना भेगा पडणे, केस गळणे
११.पोट जड वाटणे,झोप कमी होणे,सांधे दुखणे
१२.निरुत्साह,संभोगानंतर अशक्तात,डोळे निस्तेज होणे
१३.चेहरा निस्तेज होणे
१४.अल्पश्रमाने श्वास कष्टता होणे
१५.शब्द ऐकण्याची इच्छा नसणे
१६.शौचानंतर अतीप्रमाणात अशक्तपणा येणे
१७.ह्रदयाची धडधड वाढणे
१८.शौचास गेले तरी न होणे
१९.लघवी अडकणेकिंवा वारवार लघवीला जावे लागणे
२०.तोंड चिकट पडणे,भ्रम,अस्वस्थताअशा स्वरूपाची साधारण लक्षणे आढळतात.

या मलावरोधावर आयुर्वेद काय व कसे उपाचार करते याविषयीं माहिती बघू्यातमलावरोधावर ४ टप्प्यात उपचार होवू शकातात
१.पथ्यपालन
२.औषधी उपचार
३.पंचकर्म
४.अपुनर्भव /रसायन चिकित्सा

१.पथ्यपालन-
कोणत्याही आजारात पथ्यपालन महत्वाचे असते तसे मलावरोध आजारात देखील आहे.कोणते पदार्थ शक्यतो खाऊ नयेबेकरीचे पदार्थ,तिखट मसालेदार पदार्थ,मोड आलेली कडधान्ये,वाटाणा, चवली, हरभरा,आंबवलेले पदार्थमाँसाहार कमी करणे,दारू-तम्बाकू-सिगारेट बंद करणे,साबुदाना,कोरडे जेवण न करणे यासारखे पथ्य पालन केले पाहिजे,याशिवाय दुपारी न झोपणे,रात्री जास्त प्रमाणात पाणी न पिणे या गोष्टी टाळायला  हव्या.तसेच वर जी कारणे नमूद केली आहे ती टाळावीत.

२.औषध उपचार
औषध उपचारामध्ये औषध  सेवन व पंचकर्म ,व्यायाम-योगा या गोष्टी येतात. औषध उपचार करताना शौचास कोणत्या प्रकारच्या तक्रारी आहेत यावर औषधे अवलंबून असतात.यामध्ये हिरडा,त्रिफळा,सोनामुखी,मनुका,बाहवा मगज, कम्पिल्लक,दुग्ध,इसबगोल, एरंड तेल,कुटकी,खजूर,अंजीर,गुलाबकळी,गोमूत्र, आरोग्यवर्धिनी,प्रवालपंचामृत,गंधर्व हरितकी, अभयारीष्ट,फलत्रिकादी काढा,कुमारी आसवं,चिंचालवण तेल, बाळ हिरडा,ताक,अविपत्तिकर चूर्ण अशी वेगवेगळी औषधे अवस्थेनुसार ठरतात.अवस्था म्हणजे नवीन मलावरोध,व दीर्घकालीन मलावरोध.
३.पंचकर्म  उपचार
मलावरोध यामध्ये ही उपचार पद्धती अतिशय उपकारक आहे…यामध्ये बस्ति कर्म खूप महत्त्वाचे आहे.बस्ति म्हणजे शौचाच्या जागेदवारे औषधी तेल व काढे  देणे याद्वारे आतडे स्वच्छ   होतात व  मऊ  पडतात.

४.अपुनर्भव चिकित्सा
अपुनर्भव उपचार म्हणजे मलावरोध होवूच नये याकरीता काय करावे त्यावरील उपाय होय.यात नियमीत व्यायाम,योगा,स्नेहपान(रोजच्या जेवणात तेल, तूप असणे),योगसांधनेत सिद्धासन,सिहासन,वज्रासन,कुक्कुटासन,कुर्मासन,चक्रासन,पवन मुक्तासन,शलभासन,मत्स्यसन,सूर्यनमस्कार,धौती,नौली,उद्दियान बंध ,धनुरासन, सर्वागासन,हलासन, गोमुखासन,योगमुद्रा उपयोगी येतात.

बालकातील मलावरोध कारणे –
मातीखाणे,जंत  होणे, असमतोल आहार,कुपोषण,अति आहार इत्यादी करणे कारणीभूत ठरतात.

उपचार- बाळ हिरडा  मधात उगालून देणे,दुधातून एरंडेल देणे,तूप मधासह अविपट्टीकर असे लहान लहान उपाय बालकातील मलावरोध दूर करतात
सम्पूर्ण पचन प्रक्रियेत आयुर्वेदानुसार प्राण,अपान,समान हे वायू चे प्रकार कार्य करतात त्यामुळे यांचे नियत्रीत राहणे गरजेचे आहे …याकरीता पथ्य पालन गरजेचे ठरते
लेखात काही प्रश्न असल्यास जरूर विचारा व प्रतिक्रिया देखील कळवा

डॉ. राहुल रमेश चौधरी
एम.डी. आयुर्वेद,मुंबई
एम.ए.संस्कृत पुणे
पीएच् डी  स्कॉलर
संचालक औदुंबर आयुर्वेद क्लिनिक
असोसिएट प्राध्यापक ,आयुर्वेद कॉलेज ,नाशिक
मोबाईल नंबर – ९०९६११५९३०

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.