नाशिक– नाशिक येथील विविध प्रकल्पांच्या उद्घाटन कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमातनळावर आगमन झाले. यावेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या समवेत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचेही यावेळी आगमन झाले.
यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, आमदार सुहास कांदे, आमदार सरोज आहेर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुष्प देऊन स्वागत केले.
ओझर विमानतळावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथील विविध प्रकल्पांच्या उद्घाटन कार्यक्रमांसाठी मोटारीने प्रयाण केले आहे.