मुंबई – महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आल्या नंतर आता मुंबईकरांसाठी आज एक चांगली बातमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ज्या प्रवाशांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन १४ दिवस झाले असतील अशा नागरीकांना येत्या १५ ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली.आज ते समाजमाध्यमाद्वारे जनतेला संबोधित करत होते त्या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले परंतु प्रवास करण्यासाठी ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल एपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करावा लागणार आहे.ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील अशाच व्यक्तींना १५ ऑगस्ट पासून लोकल प्रवास करता येईल.
सर्वात महत्वाचं म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल मी आपणास विनंती करतो, की कुणीही अवैधरित्या, बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेऊ नयेत. लसींचे दोन डोसेस घ्यावेत व प्रवास करावा.असे आवाहन हि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.