Covishield:कोविशिल्डच्या धोक्याबद्दल सीरमने केला मोठा खुलासा

0

कोरोना महामारी रोखण्यासाठीने तयार केलेल्या कोविशील्डमुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची कबुली कंपनीने दिल्यावर जगभरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, अनेक आरोप झाल्यावर ही बाजारात उपलब्ध असणाऱ्या लसीचे सर्व डोस कंपनीने परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या लसीचे भारतात उत्पादन करणाऱ्या सीरम कंपनीने या लसीबाबत मोठा खुलासा केला आहे. कोविशिल्डचा धोका एस्ट्राझेनका कंपनीने २०२१ मध्येच सांगितला होता असा खुलासा सीरम कंपनीने केला आहे.कोरोना लसीकरणाचे मानवी शरीरावर दुष्परिणाम समोर आल्याने कंपनीने या लसीचे सर्व डोस मागे घेतले आहे.

एस्ट्राझेनका  द्वारे निर्मित कोरोना लस TTS -थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमसाठी कारणीभूत असल्याचे आढळून आले.एस्ट्राझेनका ने बनवलेली Vaxzevria ही लस यूकेसह अनेक देशांना पुरवण्यात आली होती. या लसीमुळे होणारे दुष्परिणामांचा अभ्यास देखील ही कंपनी करत आहे. आजारी व्यक्तीमध्ये रक्त गोठणे, प्लेटलेट कमी होण्याची तक्रार करण्यात आली होती. फेब्रुवारीमध्ये न्यायालयीन कामकाजादरम्यान कंपनीने लसीकरणानंतर टीटीएस दुष्परिणाम होण्याची शक्यता असल्याचे मान्य केले होते.

एस्ट्राझेनकाची कोविशिल्ड लसीचे उत्पादन हे सीरम इन्स्टिट्यूटने केले आहे.कंपनीने तयार केलेल्या कोरोना प्रतिबंधक लस कोविशिल्डमुळे टीटीएस हा दुर्मीळ दुष्परिणाम होऊ शकतो अशी कबुली कंपनीने लंडन येथील कोर्टात दिली होती. मात्र, हा धोका खूप कमी प्रमाणात असल्याचेही कंपनीने संगितले होते. एस्ट्राझेनका कंपनीने कोविशिल्डमुळे टीटीएस हा दुर्मीळ आजार होतो या बाबत न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये सांगितले होते. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता.

एस्ट्राझेनका कंपनीच्या खुलास्यानंतर भारतासह जगभरात कोविशिल्डची निर्मिती तसेच वितरण करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने या बाबत महत्वाचा खुलासा केला केला आहे. मोठा खुलासा केला आहे. सीरमने या बाबत महत्वाची माहिती दिली आहे. सीरमने म्हटले आहे की, एस्ट्राझेनकाने कोविशिल्डचा धोक्याबाबत २०२१ मध्येच सांगितले होते, असे स्पष्टीकरण सीरमने दिले आहे.

भारतासह जगभरातील कोट्यवधी नागरिकांना या लसीचे डोस दिले गेले आहे. कोरोना महामारी पासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी सीरमने ही लस तयार केली आहे. या लसीचे डोस भारतात २०२१ व २०२२ मध्ये तयार करून ते देण्यात आले होते. या लसीच्या अनेक मानवी टेस्ट देखील घेण्यात आल्या होत्या. तब्बल १ अब्ज लस तयार करून त्या वितरित करण्यात आल्या होत्या.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.