कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे नाशिककरांना आवाहन

0

नाशिक- देशासह महाराष्ट्रातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे.नाशिक मध्ये हि गेल्या काही दिवसापासून कोरोनाचे रुग्ण वाढता आहेत.आज सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक जिल्ह्यात २०० च्या वर रुग्ण आढळल्याने नाशिककरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नाशिककर जनतेला आवाहन केले आहे.

काय म्हणाले जिल्हाधिकारी

काल मुंबईत एकाच दिवसात ८०६३ नवीन कोविड रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 89% पूर्णपणे लक्षणे नसलेले आढळले आहेत. मुंबईत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता ३००००+ आहे.

नवीन रुग्णांपैकी ५०३ रूग्णालयात दाखल झाले आहेत. ५६ रुग्णांना ऑक्सिजन बेडवर ठेवण्यात आले आहे. नव्या वरियांट चा प्रसार समजण्यासाठी हे चित्र बोलके आहे.

सर्व नागरिकांना आवाहन आहे की, कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य असून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

लसीचे कवच प्राप्त करून घेणे अत्यावश्यक आहे. आता वेळ कमी आहे.

कोविड महामारीच्या या नव्या लाटेवर मात करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे अतिशय आवश्यक आहे.

– सूरज मांढरे,
जिल्हाधिकारी नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.