शिक्षणाधिकारी वैशाली झनकर एसीबीच्या ताब्यात

0

नाशिक – शाळेचे अनुदान मंजूर करण्याच्या मोबदल्यात तब्बल ८ लाखाची लाच घेतल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी संशयित वैशाली झनकर वीर लाचलुचपत कार्यालयात स्वतः हजर झाल्या आहेत.यामुळे त्यांना आता कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तपासानंतर झनकर वीर या फरार झाल्या होत्या त्यामुळे एकूण तपासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होते. दरम्यान त्यांनी वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठीही अर्ज केला होता आज त्यावर सुनावणी होणार होती.

संशयित आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर या फरार होत्या. त्यांनी आपली रवानगी तुरुंगात होऊ नये म्हणून प्रयत्न करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली होती. यासाठी त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या वतीने अ‍ॅड.अविनाश भिडे यांनी हा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज दाखल केला होता.

शिक्षण संस्थेच्या सरकारी अनुदानला मंजुरी देण्यासाठी ८ लाख रुपये लाच मागणाऱ्या नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांचा पायआणखी खोलात गेला आहे.शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्याकडे कोट्यवधींचीमालमत्ता असल्याचे समोर येतंय.वैशाली वीर झनकर त्यांच्या नावे मुरबाड, कल्याण रोड, सिन्नर नाशिक गंधारे आणि गंगापूर रोड अशा चार ठिकाणी फ्लॅट आहेत तर कल्याणमध्ये मोठी गुंतवणूक असल्याचे समोर आले आहे कोट्यावधी रुपयांची मालमत्ता आढळून आल्याने लाचलुचपत विभागाने त्यांच्याबद्दल काही तक्रारी असल्यास नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे शासनाने देखील शिक्षण आयुक्तांना वैशाली झनकर यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे येथील एका शिक्षण संस्थेकडून ८ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी वीर यांच्यासह शिक्षक पंकज दशपुते आणि वाहनचालक ज्ञानेश्वर येवले भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर झनकर यांचा ड्रायव्हर आणि एका शिक्षकासह छाप्यात आठ लाख रुपये लाच घेताना त्यांच्या रंगेहाथ सापडलयायेत.झनकरच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेले बहुतेक सर्व निर्णय संशयाच्या भोव-यात आहेत. सर्व प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी केली जाते आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.