नाशिक – शाळेचे अनुदान मंजूर करण्याच्या मोबदल्यात तब्बल ८ लाखाची लाच घेतल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी संशयित वैशाली झनकर यांना आज एसीबीने ताब्यात घेतल्या नंतर दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.तसेच त्यांच्या सोबत असलेले शिक्षक पंकज दशपुते आणि वाहनचालक यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
संशयित आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर या फरार होत्या. त्यांनी आपली रवानगी तुरुंगात होऊ नये म्हणून प्रयत्न करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली होती. यासाठी त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. आज सकाळी त्या एसीबी कार्यालयात हजर झाल्यानंतर त्यांना अटक करून दुपारी त्यांना न्यायालयात हजार करण्यात आले होते.
शिक्षण संस्थेच्या सरकारी अनुदानला मंजुरी देण्यासाठी ८ लाख रुपये लाच मागितल्याचा नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्यावर आरोप आहे.
All setting. In a day’s police custody, how much and what type of interrogation, that too in arranged setting, is possible ? She will enjoy police custody at tax payers’ cost. ACB and police force will be at her disposal.