ठाकरेंच्या गोटात मोठी खळबळ? नाशिकमधील बड्या नेत्यांची नाराजी उफाळून बाहेर

नाशिकच्या राजकारणात भूकंपाची शक्यता

1

नाशिक | ३ जून २०२५-Eknath Shinde Nashik News शिवसेना (ठाकरे गट)मध्ये नाशिकमधून जोरदार खळबळ माजली आहे. एकीकडे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, तर दुसरीकडे नाशिक महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावत सूचक वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

“शिंदे शेवटी शिंदेकडेच येणार” – एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा?(Eknath Shinde Nashik News)
विलास शिंदे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात एकनाथ शिंदे म्हणाले, “विलास शिंदे हा आमचा जुना कार्यकर्ता आहे. बाळासाहेबांचे विचार उराशी बाळगणारा कार्यकर्ता आहे. शिंदे शेवटी शिंदेकडेच येणार ना?”या वक्तव्यावरून राजकीय निरीक्षक अंदाज बांधत आहेत की, ठाकरे गटातील अनेक नेते लवकरच शिंदे गटाकडे वळू शकतात.

सुधाकर बडगुजर नाराज? स्वतःवर नाराजी व्यक्त करत दिला मोठा गौप्यस्फोट
सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “मी स्वतःवरच नाराज आहे. संघटनात्मक बदलांपासूनच नाराजी आहे. मी पूर्वीच सांगितले होते की मला जिल्हाप्रमुख पदावरून हटवावे.” मी काम करू इच्छित नाही. माझ्या जागी कोणाची तरी नियुक्ती करावी, अशी मी मागणी केली होती. त्यानुसार माझी मागणी मान्य देखील झाली. परंतु, संघटनात्मक बदल झाल्यानंतर नाराजीनाट्य चालू झालेले आहे.

त्यांनी पुढे उघड केले की, “विलास शिंदे यांच्यासह दहा-बारा नेते नाराज आहेत. त्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचल्या आहेत. ” या वक्तव्याने ठाकरे गटातील अंतर्गत कलह उघड झाला आहे.

गिरीश महाजनांचा इशारा – “ठाकरे गट संपुष्टात येणार?”
यापूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले होते की, “ठाकरे गटाचा पक्ष संपण्याच्या मार्गावर आहे. पुढील आठवड्यात त्यांच्याकडे कोणीच उरणार नाही.”
त्यांच्या या वक्तव्याला आता प्रत्यक्षात पुष्टी मिळत असल्यासारखा राजकीय सूर नाशिकमध्ये उमटत आहे.

नाशिकच्या राजकारणात भूकंपाची शक्यता
या सर्व घडामोडींमुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संघटनात्मक बदल, स्थानिक पातळीवरील नाराजी, आणि वरिष्ठ पातळीवरील दुर्लक्ष या साऱ्या गोष्टी एकत्र आल्यास या पक्षाला मोठा धक्का बसू शकतो.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!