नाशिकच्या गंगापूररोड वरील मेडिसिटी हॉस्पिटलवर गुन्हा दाखल 

0

नाशिक – कोरोनाच्या काळात रुग्णांकडून शासकीय दरापेक्षा अतिरिक्त रक्कम आकारणी करणे तसेच नाशिक महापालिकेत रुग्णांची माहिती उपलब्ध करून  न देणे आदी कारणांसाठी व या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मेडिसिटी हॉस्पिटल वर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती लेखापरीक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

गंगापूर रोड,नाशिक येथील मेडिसिटी हॉस्पिटल यांना मनपाच्या वतीने कोविड रुग्णालयाची परवानगी देण्यात आलेली होती.मात्र त्यांनी शासन निर्देशानुसार ८० टक्के रुग्णांचे देयके तपासणीसाठी उपलब्ध करून दिले नाहीत. याबाबत त्यांना अंतिम नोटीस देण्यात आलेली होती तसेच वारंवार लेखी व तोंडी पत्र देण्यात आले होते जाणून बुजून त्यांनी  तपासणीसाठी देयके उपलब्ध करून दिलेली नव्हती.मेडिसिटी हॉस्पिटल यांच्याविरोधातील लेखा परीक्षण विभागात आद्यप पावेतो कोविड-१९ च्या वाढीव देयकाबाबत एकूण ११ तक्रार अर्ज दाखल झालेले होते वेळोवेळी सदर तक्रार अर्जाबाबत रुग्णालयात लेखी परीक्षण कार्यालयाकडून नोटीसही बजावण्यात आलेल्या होत्या तथापि हॉस्पिटलकडून एकही नोटीस बाबत मुदतीत खुलासा प्राप्त झालेल्या नाही तक्रारीनुसार शासकीय नियमानुसार तपासणी केली असता यामधील तफावत रक्कम सहा लक्ष नव्यांनो हजार पाचशे रुपये तफावत आढळली होती.

रुग्णालय व्यवस्थापन यांची सदरचे कृती शासन अधिसूचना मध्ये दिलेल्या मनपा आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणारी असल्याने तसेच व्यवस्थापक डॉ मनोज कदम मेडिसिटी हॉस्पिटल यांनी त्यांच्या रुग्णालयातील एकूण खाटांची माहिती एकूण रुग्णांची माहिती देणे बंधनकारक असताना ती माहिती दिलेली नाही व एकूण ८० टक्के रुग्णांकडून शासकीय दराने देयक घेणे बंधनकारक असताना नियमापेक्षा अतिरिक्त रक्कम आकारली नियंत्रक अधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन केले आहेत त्यांना त्याबाबत वेळोवेळी नोटिसा दिल्या त्यांनी त्या स्वीकारल्या नाही म्हणून मेडिसिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉ.मनोज कदम यांच्याविरुद्ध साथरोग प्रतिबंधक अधिनियम १८९७ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० यातील विविध तरतुदींचा भंग केला  असल्या प्रकरणी व भारतीय दंड विधानाच्या १८८ इंडियन पिनल कोड १७५ तसेच साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९७ चे कलम २ व ३ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ मुंबई नर्सिंग होम (सुधारणा) अधिनियम २००६ चे कलम ७ व १७(२) नुसार फिर्याद दाखल करून याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आली असल्याची माहिती लेखापरीक्षण विभागाने कळवली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.