नाशिक,१३ सप्टेंबर २०२२- जुन्या व नव्या संगीतातील गीतांची जादू रसिकांना ब्लॅक अॅण्ड व्हाईटच्या काळात घेऊन जात होती. नाशिकमधील गायक कलावंताचे जोरदार, भावगर्भ सादरीकरण उपस्थितांना भावत होते. भारतीय चित्रपट संगीताचा वर्षोनुवर्षे असलेला गोडवा तसाच असल्याची ही अनुभूतीच होती. विश्वास गार्डन येथे या मैफिलीत रसिक चिंब न्हाऊन निघाले आणि एका जपून ठेवणार्या आठवणींचे साक्षीदार होता आले.
नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त यांनी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले म्हणाले की, नाशिककर कलावंतामध्ये एक ऊर्जा आहे त्यामुळे सांस्कृतिक, कला क्षेत्रात नाशिकचा दबदबा टिकून आहे. गायकांचे टॅलेन्ट शोधून त्यांना हक्काचे व्यासपीठ देण्याचे काम विश्वास ग्रुप करत आहे. हे निश्चितच अभिनंदनीय आहे. अशा कार्यक्रमांतून गायन क्षेत्रातील गुणवत्तेचा शोध घेता येईल. यावेळी पुलकुंडवार यांनी ‘तुम भी चलो, हम भी चले, चलती रही जिंदगी’ या गीताचे सादरीकरण केले.
विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर म्हणाले की, नाशिकही कलावंतांची खाण आहे आणि आपण या शहराचे देणे लागतो या जाणिवेतून कलावंतासाठी मुक्तपीठ आहे. ते संस्कृती संवर्धनाची गरज आहे. या विषयांवरील कलाकारांनी गीते सादर केली. भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतातील प्रथम व जास्त कालावधी असलेला हिंदी सदाबहार गीतांचा नॉन स्टॉप म्युझिकल मॅरेथॉन 2022 चे आयोजन नाशकात करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे शुभहस्ते व विश्वास ग्रृपचे कुटुंबप्रमुख विश्वास जयदेव ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.सदर म्युझिकल मॅरेथॉनमध्ये नाशिकमधील नव्या-जुन्या पिढीतील 60 हून अधिक गायक-कलाकार सहभागी झाले. त्यामध्ये एकूण 126 गाणी सादर झाली. गाणी एकत्रितपणे व सलग न सादर होता, ती सहा वेगवेगळ्या थीमवर आधारीत होती. यामध्ये सकाळी 9 ते 11 अनमोल रतन, सकाळी 11 ते 1 जीना यहॉ मरना यहाँ, दुपारी 1 ते 3 हिटस् ऑफ 90, दु. 3 ते 5 दर्द ए किशोर, सायं 5 ते 7 फिल्मी गझल, संध्या 7 ते 10 हिटस् ऑफ आर.डी. बर्मन या क्रमाने सादर झाली.
गीतगुंजन म्युझिकल परिवार, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सौ. पुलकुंडवार यांचे स्वागत सौ. शिल्पा विनय अंधारे यांनी केले.
नाशिकमध्ये संगीत क्षेत्रातील सर्व प्रसिद्ध, ज्येष्ठ, श्रेष्ठ व नवोदित गायक कलावंत यांचा एकत्रित संगम एका व्यासपीठावर व्हावा, या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विश्वास ग्रृपचे कुटुंबप्रमुख श्री. विश्वास ठाकूर, रेडिओ विश्वासच्या समन्वयक ऋचिता ठाकूर, गीतगुंजन म्युझिकल नाईट परिवाराचे श्री. भूषण कापडणे, प्रिया कापडणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.