अशोका बी.एड.महाविद्यालयात नेट – सेट स्पर्धा परीक्षेसाठी मोफत राष्ट्रीय कार्यशाळा

0

नाशिक – अशोका एजुकेशन फाऊंडेशनचे अशोका बी. एड. महाविद्यालय सातत्याने विद्यार्थी केंद्रित, समाजकेंद्रित उपक्रमाचे आयोजन करत असते.कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करता नेट – सेट सारख्या स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना उत्कृष्ठ साहित्य व मार्गदर्शन उपलब्धहोत नसल्याने . सदर परिस्थिती चा विचार करून व अनेक विद्यार्थ्यांकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनाचा विचार करून महाविद्यालयाने नेट – सेट परीक्षेत  प्रविष्ट झालेल्या विद्यार्थी व शिक्षकासाठी मोफत राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष रुकारी यांनी दिली.

कार्यशाळेचे उदघाटन एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई च्या कुलसचिव डॉ. मीरा देसाई व अशोका एजुकेशन फाउंडेशनचे सचिव श्री.श्रीकांतजी शुक्ल यांच्या हस्ते होणार असून सदर कार्यशाळेसाठी संस्थेचे उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. डी. एम. गुजराथी, संस्थाचे प्रशासक डॉ. नरेंद्र तेलंराधे यांची उपस्थिती असणार आहे. सदर कार्यशाळेसाठी संपुर्ण महाराष्ट्रातून  व बाहेरील राज्यातून अनेक विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे. डॉ.  शशिकांत शिंदे, डॉ. गणेश मुढेगावकर, डॉ. परमेश्वर बिरादार, डॉ. संतोष रुकारी, प्रा.गोकुळ मोरे, प्रा. रबाब भगत या प्रमुख साधन व्यक्तीचे मार्गदर्शन लाभणार आहे. प्रा. गणेश वाघ हे कार्यशाळेचे समन्वयक म्हणून काम बघत आहे. कार्यशाळेच्या आयोजनासाठी बी. एड. समन्वयक प्रा. सरिता वर्मा, डॉ. प्रीती सोनार, प्रा. सविता शिंदे, प्रा. समृध्दी चेपे , प्रा. आशिष गुरव, डॉ मोनाली काकडे. राजेश सावदेकर, श्री. गणेश पारवे, ग्रंथपाल सौ शुभदा दुकले यांचे मार्गदर्शन लाभत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी खालील लिंक वर जाऊन रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन अशोका बी. एड. महाविद्यालया तर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी प्रा. गणेश वाघ 9767795150 व प्रा. सरिता वर्मा 9673810986 या संपर्क क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.