केंद्रीय राज्यमंत्री ना.भारती पवार यांची नाशकात जन आशीर्वाद यात्रा
नाशिक – केंद्रीय आरोग्य व परिवार कल्याण राज्यमंत्री ना.भारती पवार यांची जन आशीर्वाद यात्रा शनिवार दि.२८ ऑगस्ट २०२१ रोजी नाशिक येथे होणार आहे. ही यात्रा दुपारी ३ वा. पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून सुरु होणार आहे. अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे व संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव यांनी दिली आहे.
जन आशीर्वाद यात्रेचा मार्ग
पाथर्डी फाटा (छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून जन आशिर्वाद यात्रेला प्रारंभ) – अंबड लिंक रोड – उत्तमनगर रोड – उत्तमनगर चौक – उत्तमनगर रोड- पवननगर- सावतानगर (स्वा.सावरकर सभागृह जवळून) – दिव्या ॲडलॅब चौक – सिडको (त्रिमूर्ति चौक)- सिटी सेंटर मॉल सिग्नल – संभाजी चौक – दक्षिण मुखी हनुमन मंदिर चौक – ग्रीन व्ह्यु हॉटेल – कॅनडा कॉर्नर – सी.बी.एस. – शिवाजी रोड – गंजमाळ सिग्नल – दुध बाजार – प्रभात टॉकीज – दामोदर टॉकीज – संत गाडगे महाराज पुतळा चौक – मेन रोड – धुमाळ पॉईन्ट (वंदे मातरम् चौक) – रविवार कारंजा – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुल – मालेगाव स्टॅड – पंचवटी कारंजा – श्री काळाराम मंदिर येथे जन आशिर्वाद यात्रेचा समारोप होणार आहे.
या जन आशीर्वाद यात्रेस कोरोना नियमाचे पालन करून सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.देवयानी फरांदे, उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष गिरीष पालवे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, आ.ॲड.राहुल ढिकले, पवन भगुरकर, सुनिल केदार, जगन अण्णा पाटील, भाजपा ज्येष्ठ नेते विजय साने, मंडल अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले आहे.