नाशिक– आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मनाला आनंद देणारा, मनाची मशागत करणारा वाचनासारखा दुसरा मार्ग नाही. वाचन हाच ध्यास असेल तर जीवन निश्चितच समृद्ध होईल. स्वतला जाणण्याच्या प्रक्रियेची सुरूवात वाचनाच्या माध्यमातून होते. वाचन हे प्रत्येकाला सुजाण करणारे माध्यम आहे. त्यासाठी‘माय बुक बास्केट’सारखे उपक्रम ग्रंथालय चळवळीला बळ देणारे आहेत. त्यातून समाजव्यवहाराचे बदलत्या वास्तावाचे भान जपणारी सुसंस्कृत पिढी निर्माण होईल असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखिका व लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी केले.
‘ग्रंथ तुमच्या दारी’विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित यशवंतराव चव्हाण ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने‘माय बुक बास्केट’या अभिनव योजनेचा शुभारंभ डॉ. भवाळकर यांच्या हस्ते वाचनप्रेरणा दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.‘विश्वास हब’सावरकरनगर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी व्यासपीठावर विश्वास ग्रुपचे कुुटुंबप्रमुख विश्वास जयदेव ठाकूर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र, नाशिकचे कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी, उपक्रमाचे संकल्पक व संयोजक, ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे प्रणेते विनायक रानडे, सुप्रसिद्ध गायक विवेक केळकर, उद्योजकडी.जे. हंसवाणी उपस्थित होते.
डॉ. भवाळकर पुढे म्हणाल्या की, ग्रंथपाल हा साहित्याविषयी आस्था, प्रेम, जिव्हाळा असणारा असावा. त्यातून तो वाचकांशी नातं जोडून ग्रंथालय समृद्ध करेल. भाषा जिवंत ठेवायची असेल तर समाजव्यवहारात भाषेचे आकलन झाले पाहिजे. यावेळी त्यांनी आपल्या नाशिकच्या साहित्य, कलाप्रवासाच्या आठवणी कथन केल्या. नाशिकचे आजोळ, कवी कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, डॉ. बाळासाहेब दातार यांचा सहवास, मार्गदर्शन, वाङमयीन जडणघडण, नाशिकमधील जुनी ग्रंथालये, तेथील जुनी ग्रंथ संपदा, यांविषयी अनुभव सांगितले. वाचन संस्कृतीमुळे नेण्यासाठी बालवाचक घडवणे व त्यांना प्रेरित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे स्वागत करतांना विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर म्हणाले की, मनावरील ताणतणाव दूर करण्यासाठी पुस्तकांशिवाय दुसरा खरा मित्र नाही. संस्कृती संवर्धन व समाज परिवर्तनाची ताकद पुस्तकांत असते. माणसाला श्रीमंती देणारी पुस्तके आहेत. कुठल्याही संस्था अशा समाजाभिमुख उपक्रमांनी लौकीक संपादन करत असते. असेही श्री. ठाकूर म्हणाले.या उपक्रमाचे संकल्पक व संयोजक विनायक रानडे म्हणाले की,‘ग्रंथ तुमच्या दारी’वाचन संस्कृतीच्या चळवळीतले हे पुढचे पाऊल म्हणायला हवे. वाचकांची अभिरूची घडवण्यासाठी, वैविध्यपूर्ण १० पुस्तकांचा खजिना या योजनेतून वाचकांना उपलब्ध होणार आहे. आपणांसारख्या सुजाण वाचकांचा प्रतिसाद भारावून टाकणारा आहे. आपण एकत्रितपणे हा उपक्रम पुढे नेऊया.
‘माय बुक बास्केट’योजनेच्या समन्वयक दीप्ती जोशी यांनी मनोगत व्यक्त केलं. वाचकांसाठी उभारलेल्या या चळवळीत मला समन्वयक म्हणून काम करण्याची संधी मी आनंदाने स्वीकारली आहे. विधायक व समाजमन घडवण्यासाठी असे उपक्रम समाजाची गरज असते.
ऋता पंडीत यांनीही मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की या निराशामय काळात आपला सर्वांना पुस्तकांच्या वाचनाने आनंद दिला व त्यातून मनाला उभारी आली. आपण सर्व मिळून वाचू-भेटू-बोलू या सुत्राने ह्या उपक्रमाला बळकटी देऊ.
यावेळी या दीप्ती धनंजय जोशी, सुवर्णा आनंद यादव, सुनिता संजय पराजपे, तृप्ती सुस्लोव बिस्वास, सुप्रिया राजेश पुसदकर, कल्पना नंदकिशोर पाठक, ऋता शैलेश पंडित, गीता गंगाधर बागुल, पुजा प्रसून, कावेरी कैलास रणदिवे, उत्तरा नितीन केळकर, कल्पना अनिल कराड, सरला कैलास घुगे, शिल्पा अजय आव्हाड, विदुला किशोर दामने, सुवर्णा क्षिरसागर,डॉ.रंजना सुधीर कुलकर्णी,डॉ.स्मिता मालपुरे, स्वाती किशोर पाचपांडे, ज्योती अशोक बोडके, श्वेता विलास काळे, डॉ. मधुरा ऋषिकेश आफळे, कविता मुकूंद गायधनी, अनिल चंपालालजी भंडारी, शरयू सागर भालेराव, अपर्णा मारवार आदि सभासद महिलांचा बास्केट व पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्मिता मालपुरे, आभार प्रदर्शन विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी यांनी केले.