ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज चांगला दिवस, *प्रदोष* आहे.”
चंद्रनक्षत्र – शततारका (रात्री ९.५३ पर्यंत) चंद्र नक्षत्र: कुंभ, रवी दुपारी ०१.१२ वाजता तुळराशीत प्रवेश करणार आहे. मेष, वृषभ, कर्क, सिंह, धनु, मकर या राशींना शुभ असणार आहे.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अत्यंत अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील. पेच सुटतील. अडथळे दूर होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मानसिक स्वास्थ्य लाभेल. प्रतिष्ठा वाढेल. शत्रू पराभूत होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उद्योग व्यवसायात वाढ होईल. अकल्पित धनलाभ होईल.दूरचे प्रवास संभवतात.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) भावना दुखावल्या जातील. मन घट्ट करा. संयम ठेवा. गैरसमज करून घेऊ नका.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) सुखाची अनुभूती मिळेल. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. कुटुंबास वेळ द्या.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) गृह सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक उलाढाल वाढेल. गुंतवणूक नफा देऊन जाईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू, ते) धार्मिक अधिष्ठान करण्यास उत्तम कालावधी आहे. स्पर्धेत यश मिळेल. विद्यार्थ्यांना खुश खबर मिळेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) भाऊबंद भेटतील आणि त्यातून महत्वाची चर्चा घडेल. कामे पुढे सरकतील. सामंजस्याची भूमिका घ्या.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा, भे) छोटे प्रवास कार्यसाधक होतील. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. आर्थिक लाभ होतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) शब्दास मान मिळेल. येणी वसूल होतील. वक्तृत्व बहरेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अध्यात्मिक लाभासाठी योग्य काळ आहे. अंतर्मुख व्हाल. जीवनाचा अर्थ समजेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक व्यवहार जपपुन करा. अयोग्य मार्गदर्शन मिळू शकेल. सरकारी कायदे पाळा.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)